कधी वाढणार एसी लोकल?

file photo
file photo

मुंबई : पश्‍चिम रेल्वे मार्गावर येणाऱ्या ‘भारत हेवी इलेक्‍ट्रिकल लि. (भेल)’ च्या दुसऱ्या एसी लोकलमध्ये अनेक तांत्रिक त्रुटी आढळल्या आहेत. त्यामुळे त्या लोकलसाठी प्रवाशांना आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

दुसऱ्या एसी लोकलचे दरवाजे उघडण्यामध्ये अडचण येत आहे. त्यात वायरिंगसंदर्भातील मुख्य समस्या असून एअर ड्रायर, हेडलाईट, ट्रान्स्फार्मर आणि ट्रॅक्‍शन मोटरमध्येदेखील अनेक समस्या आहेत. दुसरी एसी लोकल ‘मेक इन इंडिया’अंतर्गत तयार करण्यात आलेली आहे. तिचे इलेक्‍ट्रिक भाग मेधा कंपनीचे असून तिच्या चाचण्या अद्याप सुरू झालेल्या नाहीत. 

मुंबईत पहिली एसी लोकल डिसेंबर २०१७ मध्ये पश्‍चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली होती; मात्र तांत्रिक बिघाड आणि एसी सिस्टिममुळे ती सतत चर्चेत राहिली आहे. सध्या उपनगरीय रेल्वे मार्गावर तीन एसी लोकल दाखल झालेल्या आहेत. त्यापैकी दोन लोकल ‘भेल’ कंपनीच्या तर एक भारतीय बनावटीची ‘मेधा एसी’ लोकल आहे. तिसऱ्या एसी लोकलच्या चाचण्यादेखील सध्या सुरू आहेत. परंतु त्यामध्येही काही तांत्रिक समस्या असल्याचे निदर्शनास आले आहे.

एकाच कंपनीच्या गाड्या असूनही तिसऱ्या एसी लोकलमध्ये तांत्रिक अडचणी आहेत. त्या अडचणी दूर करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे पश्‍चिम रेल्वेतील वरिष्ठ अधिकाऱ्यानी सांगितले. 

आधुनिक ब्रेकिंग सिस्टिम
नव्या एसी लोकलच्या दरवाजांमध्येदेखील सुधारणा करण्यात आली आहे. त्यानुसार लोकलचे दरवाजे बंद होण्यासाठी पहिल्या लोकलपेक्षा कमी वेळ लागणार आहे. त्यात उत्तम दर्जाची आसने आणि आधुनिक ब्रेकिंग सिस्टीम आहे.

वातानुकूलित लोकलचा आतापर्यंतचा प्रवास

  • २०१२-१३ मध्ये घोषणा
  • २५ डिसेंबर २०१७ : पश्चिम रेल्वेवर पहिली आणि एकमेव एसी लोकल
  • एसी लोकल फायद्यात : आतापर्यंत २४ कोटी रुपयांचा महसूल
  • एमयूटीपी ३ प्रकल्पातून ४७ वातानुकूलित लोकल 
  • एमयूटीपी ३ ए मधून २१० वातानुकूलित लोकलसाठी तरतूद
  • एकल दिशेचे किमान तिकीट ६५ आणि कमाल तिकीट २२० रुपये
  • चेन्नईस्थित इंटिग्रल कोच फॅक्‍टरीमध्ये (आयसीएफ) एसी लोकलच्या बांधणीचे काम सुरू
  • गर्दीच्या काळात लोकल फेऱ्या रद्द करून, त्याऐवजी एसी लोकल फेऱ्या चालविल्या जातात
  • तोटा एकच, की लोकल वेळापत्रकात बदल करावा लागतो

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com