सिलिंडर स्फोटात एक जण जखमी

Cylinder-Blast
Cylinder-Blast
मुंबई - घरगुती गॅस सिलिंडरमधून गॅसगळती होऊन भीषण स्फोट घडल्याची घटना शनिवारी रात्री कल्याण पूर्वेतील नेतवली येथे घडली. यात उमेश देऊळकर हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. येथील ओमकार सोसायटीमध्ये रात्री साडेदहाच्या सुमारास हा प्रकार घडला. देऊळकर यांच्या पत्नी प्रतिभा देऊळकर यांनी सिलिंडरचे रेग्युलेटर बंद केले. तरीही गॅस बंद होत नसल्याने त्यांनी याबाबत उमेश यांना सांगितले. उमेश यांनी हा गॅस बंद केला. मात्र, काही वेळानंतर पुन्हा तो चालू करण्यासाठी गेले असता मोठा स्फोट होऊन ते जखमी झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com