इंडिकेटरचे वाजले की बारा! 

इंडिकेटरचे वाजले की बारा! 

दिवा - मध्य रेल्वे मार्गावरील कोपर रेल्वेस्थानकातील इंडिकेटर अधूनमधून बंद पडत असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. याबाबत काही दक्ष प्रवाशांनी प्रशासनाला विचारणा केल्यास तात्पुरत्या स्वरूपात दुरुस्ती केली जाते; मात्र काही दिवसांनंतर पुन्हा इंडिकेटरमध्ये बिघाड होतो. सुविधांच्या बाबतीत उपेक्षित राहिलेल्या या स्थानकाकडे रेल्वे प्रशासन गांभीर्याने लक्ष कधी देणार, असा सवाल प्रवाशांकडून केला जात आहे. 

कोपर स्थानकातील फलाट क्रमांक दोनवर दोन इंडिकेटर आहेत. त्यातील फक्त एकच इंडिकेटर सुरू असतो; तर दुसऱ्या इंडिकेटरची पूर्णपणे दुर्दशा झाली आहे. एका इंडिकेटरचा काही भाग तुटलेला असून तो कधीही निखळून पडू शकतो. त्यात प्रवासीही जखमी होण्याची शक्‍यता आहे. सकाळी शाळा, महाविद्यालय; तसेच कामावर जाण्यासाठी प्रवासी कोपर स्थानकावर आल्यास चुकीच्या इंडिकेटरमुळे त्यांना मनस्ताप सहन करावा लागतो. इंडिकेटर बंद असल्याने कोणती जलद गाडी; तर कोणती धिमी गाडी हे प्रवाशांना नीट कळत नाही. त्यामुळे फलाटावर प्रवाशांची गर्दीही वाढते. काही प्रवाशांना जलद गाड्या पकडायच्या असल्यास इंडिकेटरमुळे धिम्या गाडीत चढल्याने कामावर उशीर होतो. ते प्रवासी रेल्वेच्या कारभारावर आगपाखड करतात.

दुरुस्तीची जबाबदारी दिव्याचीच 
कोपर स्थानक हे दिवा रेल्वेस्थानकाच्या अखत्यारित येते. त्यामुळे इंडिकेटर दुरुस्तीची जबाबदारी दिव्याचीच आहे. सध्या असलेला बिघाड एक-दोन दिवसांत दुरुस्त होईल, असे एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com