उसगाव येथील धाडीत अनधिकृत दगड खडी साठा जप्त

उसगाव येथील धाडीत अनधिकृत दगड खडी साठा जप्त

वज्रेश्वरी - ठाणे गौण खनिज दक्षता पथक यांना मिळालेल्या माहितीनुसार भिवंडी तालुक्यातील उसगाव या ठिकाणी सर्व्हे नंबर 95/2 या जागेमध्ये सुरु असलेल्या अनधिकृत दगड खाणीत मोठ्या प्रमाणात उत्खनन केलेले दगड खडी सापडले. त्यामध्ये एक जेसिबी, एक डंपर जप्त करून गणेशपुरी पोलिस ठाणे येथे आज गुन्हा दाखल करण्यात आला आहे

याबाबत अधिक माहिती अशी की, दिनेश चंद्रकांत पाटील यांनी सदर जागेत एकूण 1062 ब्रास दगड उत्खनन केल्याचे जिल्हा खनिजकर्म अधिकारी यांच्या पथकाच्या निदर्शनास आले. याबाबत या पथकाने मोजमाप घेतले असता लगतच सुमारे 40 ते 50 ब्रास दगडसाठा, व जेसिबी, व एक डपर आढळून आला.  

दरम्यान या धाड सत्रामध्ये मंडळ अधिकारी दुर्योधन खेडकर, तलाठी श्री राम घागस यांनी सदरचा मुद्देमाल जागेवर जप्त करून उत्खननदार दिनेश पाटील यांच्या विरुद्ध गणेशपुरी पोलिस ठाणे येथे पर्यावरण ऱ्हास, व शासनाच्या मालमत्तेची गौण खनिज चोरी केले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सदर मुद्देमालाचा पंचनामा करून जप्त करण्यात आला आहे. मात्र आरोपी अद्यप फरारी असल्याचे माहिती गणेशपुरी पोलिस ठाणेचे पोलिस हवालदार कोणकी यांनी दिली असून, अधिक तपास सुरू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com