गटारावरील उघड्या झाकणांना मालक मिळणार का? : नवाब मलिक

Nawab-Malik.jpg
Nawab-Malik.jpg

मुंबई : गोरेगाव येथील गटारावरील उघड्या झाकणामुळे चिमुरड्याचा मृत्यू झाला असून याप्रकरणी संबंधितावर 304 अन्वये गुन्हा दाखल करुन दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे.

गोरेगावमध्ये गटारावरील उघड्या झाकणामुळे त्यामध्ये पडून एका मुलाचा मृत्यू झाला ही दुर्दैवी घटना आहे. याआधी अनेक लोकांचे गटारात पडून मृत्यू झाले आहेत आणि या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यांच्या मृत्यूची जबाबदारी अद्याप कुणावर ठेवण्यात आलेली नाही असेही नवाब मलिक म्हणाले. 

महापालिकेने गटारावरील प्लास्टिकची झाकणं खरेदी केली ती पावसाच्या पाण्यात वाहून जात आहेत. या घटना पालिकेच्या हलगर्जीपणामुळे घडत आहेत असा आरोपही नवाब मलिक यांनी केला आहे.

दरम्यान वारंवार घडणाऱ्या या घटनांची जबाबदारी सरकारने निश्चित करावी अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली आहे.

"गोरेगाव येथील बालकाच्या मृत्यूप्रकरणी संबंधितांवर 304 अन्वये गुन्हा दाखल करा" - नवाब मलिक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com