‘डीएसकें’सह पत्नी, मुलाविरोधात दोषारोपपत्र

‘डीएसकें’सह पत्नी, मुलाविरोधात दोषारोपपत्र

कोल्हापूर - गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या ‘डीएसके’ तथा दीपक कुलकर्णींसह त्यांच्या पत्नी आणि मुलाविरोधात आर्थिक गुन्हे शाखेने आज जिल्हा सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. न्यायाधीश ए. यू. कदम यांच्या न्यायालयात साडेचार हजार पानांचे दोषारोपपत्र सादर झाले. 

३५० गुंतवणूकदारांची १९ कोटी ७७ लाख ८० हजार ५१७ रुपयांची फसवणूक झाल्याचे दोषारोपपत्रात नमूद केले आहे. सर्व गुंतवणूकदारांचा साक्षीदार म्हणून समावेश केला आहे. 
पुण्यातील बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्या ‘डीएसके’ ग्रुपमध्ये गुंतवणूक केलेल्या राज्यभरातील गुंतवणूकदरांची कंपनीने हजारो कोटींची फसवणूक केल्याचे उघडकीस आले. जिल्ह्यातील गुंतवणूकदारांचाही यात समावेश आहे. या गुंतवणूकदारांनी एकत्र येत राजारामपुरी पोलिस ठाण्यात दीपक कुलकर्णी यांच्यासह त्यांच्या पत्नी हेमंती व मुलगा शिरीष यांच्याविरोधात फिर्याद दिली होती. जानेवारी २०१८ मध्ये हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. तेथे ३५० तक्रारदारांची १९ कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक झाल्याचे चौकशीत समोर आले. 

तपास अधिकारी पोलिस उपअधीक्षक राजेंद्र शेंडे यांनी न्यायाधीश कदम यांच्या न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. तसेच, तपास पथकाने कोल्हापूरसह सांगली जिल्ह्यातील ‘डीएसके’च्या मालमत्ता ‘सील’ करण्यासंदर्भात तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या पत्रव्यवहाराचा यात समावेश आहे. 
दोन्ही ठिकाणांच्या सात मालमत्ता ‘सील’ केल्याचे तपास अधिकारी शेंडे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com