बेकायदेशीर वाळूउपसा केल्याप्रकरणी ठेकेदारावर कारवाई

crime
crime

आटपाडी : माळेवाडी (ता. आटपाडी) येथे पाणीपुरवठा विहिरीच्या कामासाठी बेकायदेशीर वाळू उपसा करून साठा केल्याप्रकरणी संबंधित ठेकेदारावर महसूल विभागाने छापा टाकून कारवाई केली.             

माळेवाडी गावातून तीनशे फूट रुंदीचे ओढापात्र जाते. या पत्रात भरमसाठ चांगली वाळू आहे. उपशाला गावातून विरोध केला जातो. त्यामुळे ओढापात्रात वाळू आहे. गावासाठी नवीन पाणीपुरवठा विहीर आणि पाईपलाईन योजना मंजूर झाली आहे. या योजनेचे काम गेली सहा महिने सुरू आसून गावातीलच राजकीय नेता काम करीत आहे.  

या विहिरीच्या बांधकामासाठी संबंधित ठेकेदार नात्याने दहशत वापरून व ग्रामपंचायत सदस्य आणि इतर नेते मंडळींना हाताशी धरून वाळू साठा केला होता. गेली पंधरा दिवस जेसीबीच्या सहाय्याने उपसा सूरू होता. शिवाय कामाच्या नावाखाली राजरोज विक्री सुरू होती. त्यामुळे तरूणांनी याची माहिती महसूल विभागाला दिली.

पाणीपुरवठा योजनेचे काम सरपंचाचे नातेवाईक करीत आहेत. गावकामगार तलाठी अण्णासाहेब अडसूळ आणि महसूल विभागातील कर्मचाऱ्यांनी या साठ्यावर छापा टाकून साठ्याचा पंचनामा केला. अडीच ब्रास वाळूचा पंचनामा कागदोपत्री दाखवला असला तरी प्रत्यक्षात हा साठा 20 ते 25 ब्रास चा असल्याची चर्चा आहे. कामासाठी आणी विक्री केलेल्या वाळूचा पंचनामा करण्याची मागणी आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com