समाजातील सर्व लोक गणेशोत्सवाच्या माध्यमातून एकत्रित - रोहिणी भाजीभाकरे

All the people of the society gathered through Ganeshotsav says Rohini Bhajibhakare
All the people of the society gathered through Ganeshotsav says Rohini Bhajibhakare

उपळाई बुद्रूक (जि. सोलापूर) - समाजातील सर्व घटकातील लोकांना गणेशोत्सवाच्या माध्यामातून एकत्रित आणण्याचे काम लोकमान्य टिळकांनी केले. त्यांचे खुप छान प्रतिक गावोगावी गणेशोत्सवाच्या काळात पहायला मिळते. असे प्रतिपादन तामिळनाडू राज्यातील सेलमच्या जिल्हाधिकारी रोहिणी भाजीभाकरे-बिदरी यांनी केले. 

माढा तालुक्यातील उपळाई बुद्रूक येथील माउली गणेश तरुण मंडळाच्या कार्यक्रम प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी पोलिस उपायुक्त डॉ. संदिप भाजीभाकरे उपस्थित होते.

जिल्हाधिकारी भाजीभाकरे पुढे म्हणाल्या की, माझी वक्तृत्व करण्याची सुरवात लहानपणी गणेश मडळांच्या वक्तृत्व स्पर्धेतून झाली. त्यामुळे आज महाराष्ट्र नव्हे तर तामिळनाडू सारख्या गुंतागुंती असलेल्या भाषेच्या राज्यात भाषण करण्याची कुवत माझ्यात निर्माण झाली. 

विविध अधिकाऱ्यांची उपळाई बुद्रूक गणेशोत्सवात उपस्थिती - गणेशोत्सव उत्साहात सहभागी होण्यासाठी उपळाई बुद्रूक येथे कर्नाटकचे माजी पोलिस महासंचालक शंकर बिदरी, त्यांच्या पत्नी डाॅ. उमादेवी बिदरी, आयकर उपायुक्त स्वप्निल पाटील, माढ्याचे तहसीलदार सदाशिव पडदुणे, डाॅ. रजनी भाजीभाकरे आदी जणांनी उपस्थिती दर्शविली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com