सांगली जिल्हा परिषदेच्यावतीने शहीद जवानांच्या कुटुंबियांना मदत

सांगली जिल्हा परिषदेच्यावतीने शहीद जवानांच्या कुटुंबियांना मदत

सांगली - येथील जिल्हा परिषद पदाधिकारी, अधिकारी व सदस्यांकडून पुलवामा येथे शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांसाठी आर्थिक मदत देण्याची घोषणा जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी केली. जि. प. सर्वसाधारण सभेत शहीद जवानांना श्रद्धांजलीचा ठराव करून प्रारंभी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

जिल्हा परिषदेची सर्वसाधारण अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली सभा जि. प. च्या वसंतदादा सभागृहात झाली. यावेळी बोलताना सरदार पाटील यांनी सैन्यदलातील अडचणी व समस्या याबाबत थोडक्यात अनुभव सांगितले. यावेळी आपले एक मानधन शहीद जवानांच्या मदतीसाठी देण्याचे जाहीर केले. याला अनुमोदन देत अर्जुन पाटील यांनी अनुमोदन देत सर्वच सदस्यांचे एक मानधन शहीद जवान मदतीसाठी द्यावी असे सांगितले. 

अध्यक्ष श्री  देशमुख यांनी यावेळी बोलताना सर्व पदाधिकारी यांचे एक महीन्याचे मानधन, सदस्यांचे एक मानधन व सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे एक दिवसाचे वेतन देण्याचा निर्णय जाहीर केला. सभागृहाने एक मताने हा ठराव मंजूर करून शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करीत करून शहीदांच्या कुटुंबियांना आधार देण्यात हातभार लावला.

यावेळी सीईओ अभिजित राऊत, उपाध्यक्ष सुहास बाबर, अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी विक्रांत बगाडे, सभापती अरूण राजमाने, तम्मनगौडा रवी पाटिल, ब्रम्हदेव पडळकर, प्रा. सुषमा नायकवडी, मुख्य लेका व वित्त अधिकारी डाॅ. राजेंद्र गाडेकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गावडे उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com