आसबेवाडी ग्रामस्थांनी म्हैसाळच्या सहाव्या टप्प्याचे काम बंद पाडले

mangalwedha
mangalwedha

मंगळवेढा - मंगळवेढ्याच्या दक्षिण भागातील शेतीला म्हैसाळ योजनेचे काम आसबेवाडी ग्रामस्थांनी थांबविले. त्यांच्या मागण्यांची पूर्तता झाल्याशिवाय हे काम चालू होऊ देणार नाही अशा इशाऱ्याचे निवेदन पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांना निवेदनाद्वारे दिला आहे. लोकसभा निवडणूक जाहीर होण्यापुर्वी पाण्यासाठी या गावाने दिलेला इशारा राज्यकर्तेना तापदायक ठरणार आहे.

सोड्डी शिवनगी आसबेवाडी या तिन गावाचे हे निवेदन पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या तालुक्यातील दुष्काळी भागाचा दौय्रात दिले. म्हैसाळच्या सहाव्या टप्प्यातील योजनेचे काम सुरू असून तलावाशेजारून पाईपलाईन गेली असून या ठिकाणी पाणी सोडण्याची व्यवस्था केली. 

योजनेचा लाभात आसबेवाडी, सोड्डी, शिवनगी या गावांचा समावेश व्हावा अशी मागणी करत गावकऱ्यांनी आमची गावे समावेश न झाल्यास यापूर्वीच्या आंदोलनासारखे तीव्र आंदोलन लोकसभेपुर्वी करण्यात येईल असा इशारा दिला. पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी जलसंपदामंत्री अशी बैठक घेण्यात येईल असे सांगितले. परिचारक यांना सरकारचे सहयोगी सभासद आहात मुख्यमंत्र्यांनी असलेल्या संबंधातून या पाच गावातील शेतकऱ्यांचा विचार करून यावर लवकरात लवकर निर्णय घ्यावा. पिढ्यांपासून दुष्काळाच्या खाईत असणारी ही गावे डोळ्यासमोरून पाणी जात असताना आपल्याला मिळणार  नाही शासन स्तरावर आमच्या गावांना पाणी योजनेत समावेश करण्याबाबत प्रयत्न करावेत अशी मागणी करण्यात आली. 

याप्रसंगी संजय नागणे भागवत भुसे रमेश आसबे आनंदा आसबे दत्ता आसबे हनमंत मोरे शिवणगीचे सरपंच जक्कन्ना सोमुत्ते असबेवाडीच्या सरपंच कलावती आसबे महेश आसबे माणिक खटकाळे सुखदेव मोरे संजय गुंडे श्री शैल्य धायगुडे दत्ता टिक्के भाऊ जाधव तानाजी जाधव. उल्हास भुसे नागेश भुसे समाधान खटकाळे धनाजी बावचे संजय आसबे सुरेश आसबे बालाजी भुसे बाळू भुसे अंकुश नागणे बालाजी भुसे तुळशीराम सपकाळ रतिलाल असबे महेश खटकाळे श्याम आसबे बबन खताळ उत्तम भुसे मारुती भुसे नागनाथ मोरे पिंटू आसबे महादेव बावचे दगडू मोरे यासह शेकडो शेतकरी या वेळी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com