पन्हाळा येथे भूखंड हडपण्याचा प्रयत्न उघडकीस

पन्हाळा येथे भूखंड हडपण्याचा प्रयत्न उघडकीस

आपटी - पन्हाळा येथील सर्व्हे नंबर ८अ/१अ/८ याचा सिटी सर्व्हे नंबर ६३६ असताना शासकीय अधिकाऱ्यांची दिशाभूल करत सिटी सर्व्हे नंबर ६३५ च्या सरकारी शेतीकडे असलेल्या व नगर परिषदेने शिवस्मारक व उद्यानासाठी आरक्षित केलेल्या रिकाम्या जागेवर तारेचे कुंपण लाऊन २४ आर क्षेत्राचा भूखंड हडपण्याचा सुरु असलेला प्रयत्न आज उघडकीस आला. हा प्रकार लक्षात येताच पन्हाळा पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण यांनी येथे चालू असलेले काम थांबविण्याचे आदेश दिले.  

याबाबत अधिक माहिती अशी की,पन्हाळा येथील सिटी सर्व्हे नंबर ६३५ ही जागा आगाऊ ताब्याने नगर परिषदेला शिवस्मारक व उद्यानासाठी दिली आहे. त्यानुसार नगरपरिषदेने या जागेवर बालोद्यान उभारले आहे व शिवस्मारकाचे काम चालू आहे. असे असतानाही अमेरिका स्थित खासगी मालकाने मालमत्ता पत्रकावर १४ जुन २०१८ रोजी आपले नाव नोद केले आहे व विकासनकारामार्फत या जागेवर तारेचे कुंपण लाऊन जागा बंदिस्त करण्याचे काम चालू केले आहे. त्यामुळे गेली चार दिवस नागरिकांच्यात चर्चा चालू होती.

याबाबत विकसक विजय यादव याचेकडे चौकशी केली असता त्यांनी ही जागा खासगी मालकीची असलेचे सांगत त्याबाबतचे कागद दाखवले. मात्र मुख्याधिकाऱ्यांनी काम थांबवण्याचे आदेश दिले  आहेत. सदर कागद पत्रातील नोंदी दिशाभूल करण्याऱ्या असल्याचे माजी नगराध्यक्ष आसिफ मोकाशी यांनी निदर्शनास आणले आहे. याबाबतीत तहसिदार व भूमी अभिलेख कार्यालयाकडे चौकशी केली असता याबाबतीत रीतसर चौकशी करून नोंदी रद्द करणार असल्याचे सांगितले.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com