....तर भाजपलाही पाठिंबा देवु : राजु शेट्टीं

....तर भाजपलाही पाठिंबा देवु : राजु शेट्टीं

कऱ्हाड : लोकसभेमध्ये संपुर्ण कर्जमुक्तीचे अधिकार विधेयक आणि उत्पादन खर्चाच्या दिडपट हमीभावाचे अधिकार विधेयक मांडले आहे. त्याला सत्ताधारी शिवसेनेबरोबरच काँग्रेस, राष्ट्रवादीसह 23 पक्षांनी पाठिंबा दिला आहे. राज्यात व केंद्रात सत्तांतर झाल्यास ज्यावेळी हे विधेयक चर्चेला येईल त्यावेळी त्याचे विधेयकात रुपांतर झाले पाहिजे हा आमचा मुख्य मुद्दा आहे. 

भाजपला आमचा पाठिंबा हवा असेल तर त्यांनी दोन्ही विधेयके सरकारी विधेयके म्हणुन मांडुन त्याचे कायद्यात रुपांतर करावे, असे खुले आव्हाण खासदार राजु शेट्टी यांनी आज भाजपला दिले. दरम्यान मात्र त्यांना तसे करायचे असते तर त्यांनी अधिच केले असते. ते करत नाहीत हे आम्हाला माहिती आहे. त्यामुळे पाठिंबा देण्याचा प्रश्नच नाही, अशीही टिप्पनी त्यांनी यावेळी केली.

माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्यासमवेत बैठक झाल्यानंतर खासदार शेट्टी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष सचिन नलवडे, अनिल घराळ यांच्यासह पदाधिकार उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com