कोल्हापूरः शिक्षण संस्थेचा अध्यक्ष कोटीचा गंडा घालून पळाला 

कोल्हापूरः शिक्षण संस्थेचा अध्यक्ष कोटीचा गंडा घालून पळाला 

जयसिंगपूर - कॉलेजमध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवून सुमारे 55 जणांना सुमारे एक कोटीचा गंडा घालून शिक्षण संस्थेच्या अध्यक्षाने शहरातून पोबारा केला आहे. पैशाची जबाबदारी घेतलेल्या कॉलेजच्या प्राचार्याला धक्काबुक्कीचा प्रयत्न झाला. संस्थेची मालमत्ता विकून संबंधितांना पैसे परत करण्याचे लेखी दिल्यानंतर वादावर पडदा पडला. दरम्यान, कॉलेजच्या कर्मचाऱ्यांचाही पगार थकला आहे. शहर परिसरातील एका कॉलेजमध्ये हा प्रकार घडला. 

कॉलेजच्या अध्यक्षाने लिपिक, पर्यवेक्षक, शिपाई पदावर नोकरी लावण्याचे अमिष दाखवून सुमारे 55 तरुणांकडून एक ते तीन लाखाची रक्कम घेतली आहे. कॉलेजची अवस्था खूपच बिकट बनल्याने पैसे घेऊन अध्यक्षाने काही दिवसापूर्वी शहरातून पळ काढला आहे. फसलो गेल्याचे लक्षात येताच नोकरीसाठी पैसे देणाऱ्यांनी कॉलेजवर फेऱ्या मारण्यास सुरुवात केली. मात्र, अध्यक्ष भेटत नसल्याने अनेक जण निराश बनले आहेत. 

प्राचार्यानी पैशाची जबाबदारी घेतली होती. वेळेत पैसे मिळत नसल्याने अनेकांनी सोमवारी कॉलेजवर गर्दी केली. अध्यक्ष गायब झाल्याने तुम्ही पैशाची जबाबदारी घेतली होती. मग आमचे पैसे का मिळत नाहीत असा जाब प्राचार्यांना विचारला. संतापलेल्या काहींनी धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला. 
अध्यक्षाविरोधात पोलिसातही तक्रार झाल्याचे समजते.

कर्मचारीही पगारापासून वंचित आहेत. कर्मचाऱ्यांमध्येही संताप व्यक्त केला जात आहे. काल अनेकांनी कॉलेजवर गर्दी करुन प्राचार्यांना धारेवर धरले. अखेर कॉलेजची मालमत्ता विक्री करुन संबंधितांचे पैसे परत करण्याचे लेखी देण्याचे ठरल्यानंतर वादावर पडदा पडला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com