खंडाळ्यातील लिपिक लाच घेताना जाळ्यात 

खंडाळ्यातील लिपिक लाच घेताना जाळ्यात 

खंडाळा - जमीनवरील "32 ग' ची नोंद रद्द करण्यासाठी 50 हजार रुपयांची लाच स्वीकारताना येथील तहसीलदार कार्यालयातील लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज अटक केली. 

अरुण गुलाब अहिरे (रा. विघ्नहर्ता कॉम्प्लेक्‍स, दुसरा मजला, विद्यानगर शिक्षक कॉलनी, खंडाळा) असे त्याचे नाव आहे. संबंधित तक्रारदाराच्या शेत जमिनीवर "32 ग' ची नोंद होती. ती कमी करण्यासाठी त्यांनी तहसीलदार कार्यालयात अर्ज केला होता. त्यानुसार नोंद कमी करण्यासाठी अहिरे याने तक्रारदाराकडे 50 हजार रुपयांची मागणी केली होती. याबाबत तक्रारदाराने आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली. त्यानुसार उपअधीक्षक अशोक शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने तातडीने पडताळणी करत सापळा रचला. या कारवाईत अहिरे याला 50 हजार रुपयांची लाच स्वीकारताना त्याच्या राहत्या घरात पकडण्यात आले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया खंडाळा पोलिस ठाण्यात सुरू होती. कोणत्याही लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या 1064 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन उपअधीक्षक शिर्के यांनी केले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com