खंडाळा : तहसीलदार कार्यालयातील लिपीकाला लाच घेताना अटक

The clerk in Tahsildars office of Khandala was arrested for taking a bribe
The clerk in Tahsildars office of Khandala was arrested for taking a bribe

खंडाळा : जमिनीवरील 32 ग ची नोंद रद्द करण्यासाठी 50 हजार रुपयांची लाच स्विकारताना येथील तहसीलदार कार्यालयातील लिपीकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज अटक केली आहे. 

अरूण गुलाब अहिरे (रा. विघ्नहर्ता कॉम्प्लेक्‍स, दुसरा मजला, विद्यानगर शिक्षक कॉलनी, खंडाळा) असे अटक केलेल्या लिपीकाचे नाव आहे. संबंधित तक्रारदाराच्या शेत जमिनीवर 32 ग ची नोंद होती. ती नोंद कमी करण्यासाठी त्यांनी तहसीलदार कार्यालयात अर्ज केला होता. त्यानुसार नोंद कमी करण्यासाठी अहिरे याने तक्रारदाराकडे 50 हजार रुपयांची मागणी केली होती. याबाबत तक्रारदाराने आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली. त्यानुसार उपअधिक्षक अशोक शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने तातडीने पडताळणी करत सापळा कारवाईचे आयोजन केले. 

या कारवाईत अहिरे याला 50 हजार रुपयांची लाच स्विकारताना त्याच्या राहत्या घरात रंगेहाथ पकडण्यात आले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया खंडाळा पोलिस ठाण्यात सुरू होती. कोणत्याही लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या 1064 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन उपअधिक्षक शिर्के यांनी केले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com