300 रुपयांची लाच घेणाऱ्या लिपिकाला रंगेहाथ पकडले 

300 रुपयांची लाच घेणाऱ्या लिपिकाला रंगेहाथ पकडले 

सोलापूर : रेशन कार्डवरील मयत वडिलांचे नाव कमी करून मुलाच्या नावाची नोंद करण्यासाठी 300 रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या दक्षिण सोलापूर तहसील कार्यालय पुरवठा विभागातील लिपिक मळसिद्ध बिराप्पा जडगे (वय 31, रा. चिंचपूर, ता. दक्षिण सोलापूर) यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई मंगळवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास दक्षिण सोलापूर तहसील कार्यालयात करण्यात आली. 
यातील तक्रारदाराच्या वडिलांचे निधन झाले आहे.

रेशन कार्डवरील वडिलांचे नाव कमी करून स्वत:च्या नावाची नोंद करण्यासाठी त्यांनी सेतू कार्यालयात अर्ज केला होता. हे काम लिपिक जडगे याच्याकडे प्रलंबित होते. रेशन कार्डावरील वडिलांचे नाव कमी करून मुलाचे नाव लावण्यासाठी लिपिक जडगे याने 300 रुपये लाचेची मागणी केली. याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्यात आली. एसीबीच्या पथकाने तक्रारीबाबत खात्री केली. मंगळवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास दक्षिण सोलापूर तहसील कार्यालयात 300 रुपयांची लाच स्वीकारताना लिपिक जडगे यास रंगेहाथ पकडण्यात आले आहे. एसीबीचे पोलिस उपअधीक्षक अरुण देवकर, पोलिस निरीक्षक कविता मुसळे, सहायक फौजदार नीलकंठ जाधवर, हवालदार पवार, शिपाई सिद्धाराम देशमुख, जानराव यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com