Loksabha 2019 : 23 तारखेला कळेल कुणाची चड्डी उतरेल : मुख्यमंत्री

Devendra Fadnavis
Devendra Fadnavis

कुर्डुवाडी (जि. सोलापूर) : पवारसाहेब जेव्हा चड्ड्या घातल्या जात होत्या, तेव्हा तुम्ही याच चड्डीवाल्यांचा पाठिंबा घेऊन मुख्यमंत्री झाला. तेव्हा चड्ड्या चांगल्या वाटल्या. आता तुमच्याकडून गेल्यानंतर चड्ड्या आठवत आहेत. 23 तारखेला लोकांनाच कळेल कोणाच्या चड्ड्या उतरल्या आहेत, अशी जोरदार टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. 

येथील रेल्वे मैदानावर भाजप-शिवसेना महायुतीच्या जाहीर सभेत ते बोलत होते. मुख्यमंत्री म्हणाले, की शरद पवार यांचा तोल सुटला आहे. ते म्हणत आहेत, भाजपमध्ये गेला असला तरी चड्ड्या घालून मांड्या दाखवू नका. पण, पवारसाहेब आता इथे चड्ड्या नाही फुल पॅन्ट घालतात. गरिबी हटवू, गरिबी हटवू असे म्हणत 55 वर्षे सत्तेत असणाऱ्या कॉंग्रेसने सर्वसामान्यांची गरिबी हटवली नाही; परंतु त्यांच्या नेत्यांची व चेल्यांची मात्र गरिबी हटवली, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीवर केली. 

फडणवीस म्हणाले, "कॉंग्रेसने 55 वर्षे तीच ती पूर्ण न करणारी आश्‍वासने दिली; परंतु गेल्या पाच वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माणसाच्या जीवनात परिवर्तन करणाऱ्या अनेक उपयोगी योजना अमलात आणल्या. लातूर येथे आमच्या सरकारने फक्त 60 दिवसांत रेल्वेचे कोच बनवण्याचा कारखाना उभा करण्यास मंजुरी देऊन भूमिपूजनही केले. या लोकसभेच्या निवडणुकीनंतर रेल्वेमंत्री प्रत्यक्ष येथे येऊन येथील रेल्वे कारखान्याचा प्रश्‍न सोडवतील. आपल्यावर दहशतवादी हल्ला झाला की कॉंग्रेस आघाडीचे सरकार पाकिस्तानचा निषेध करत फक्त चर्चा करत होती. मोदी सरकारच्या काळात सर्जिकल, एअर स्ट्राइक करत दहशतवाद्यांना मारून त्यांचे अड्डे उद्‌ध्वस्त केले. भाजप सरकार पुन्हा येणार व आम्ही कृष्णा-भीमा स्थिरीकरण निश्‍चित करणार.''

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com