उसाच्या ट्रॉलीला धडकून दोघांचा मृत्यू

उसाच्या ट्रॉलीला धडकून दोघांचा मृत्यू

कऱ्हाड- ऊसाच्या ट्रालीला मागून दुचाकीने जोराची धडक दिल्याने दोन युवक ठार झाले आहेत. गणेश दिलीप आटोळे (वय 28) व अमर तुकाराम शेळके (30 दोघे रा. उंब्रज) अशी ठार झालेल्यांची नावे आहेत.

पुणे-बंगळुरू महामार्गावर सायंकाळी आठच्या सुमारास पाचवड फाटा येथे हा अपघात झाला. दोघेही आचारी काम करतात त्या कामानिमित्त ते पाचवड फाटा भागात आले होते. परतताना अपघात झाल्याचे समजते. दुचाकी (एम.एच. 50-पी4252) घेवून ते या भागात आले होते. सायंकाळी साडेसातच्या सुमारास ते पुन्हा उंब्रजकडे निघाले होते. त्यावेळी दुर्घटना घडली.

पाचवड फाटा येथे ते एका वाहनाला पास करून पुढे निघाले होते. त्यावेळी समोरच्या वाहनाशी त्यांची जोराची धडक झाली. धडक इतक्या जोरात होती की, दोघेही खाली कोसळून ठार झाले. अपघाताची माहिती पोलिसांना समजल्यानंतर पोलिस घटनास्थळी पोचले होते. अपघाताची सविस्तर माहिती हाती आली नव्हती. दुचाकीवरून संबधित युवकांची माहिती स्पष्ट झाली. त्यानुसार पोलिसांनी पुढचा तपास सुरू ठेवला आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com