मंगळवेढ्यात कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

mangalwedha
mangalwedha

मंगळवेढा - तालुक्यातील पाटकळ येथील भारत गडदे वय 60 यांनी कर्जाला कंटाळून गळफास घेत आत्महत्या केली. तालुक्यातील या तीन आठवड्यातील ही तिसरी आत्महत्या आहे.

दुष्काळाची भीषण तीव्रता जाणवू लागली आहे. परंतु, प्रशासन  ठोस पावले उचलत नसल्यामुळे शेतकऱ्यासमोर आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय नाही. राष्ट्रीयकृत बँकेकडून कर्जरूपाने मदत नवीन वाटप होत नाही. त्यामुळे जादा व्याजदराच्या पतसंस्था मायक्रो फायनान्स व सावकराशिवाय पर्याय नाही. सध्या दारातील पशुधन दुधातील कमी दरामुळे परवडत नाही तर पाण्याअभावी फळबागा व पिके जळून गेली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com