वसतिगृह उद्‌घाटनानंतर बंदच; विद्यार्थ्यांकडून घेतली फी

hostel
hostel

सोलापूर : सोलापुरात शिक्षणासाठी परगावाहून आलेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना राहण्याची सोय व्हावी, या उद्देशाने रंगभवन परिसरात वसतिगृह सुरू करण्यात आले. परंतु, उद्घटनापासून ते एकदाही उघडले नाही. दुसरीकडे मोफत व्यवस्था असतानाही विद्यार्थ्यांकडून सात हजार रुपये फी ची मागणी करण्यात येत असल्याचे विद्यार्थ्यांकडून सांगण्यात आले. 

वसतिगृहाच्या प्रवेशासाठी पात्र असूनही विद्यार्थ्यांसाठी ते खुले करण्यात आलेले नाही. तसेच त्या विद्यार्थ्यांकडून फी ची मागणी केल्यानंतर त्यांनी सकल मराठा समाजाचे जिल्हा समन्वयक माऊली पवार यांची भेट घेतली. त्यानंतर श्री. पवार यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्याशी संपर्क केला. त्याची गंभीर दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारी विद्यार्थ्यांशी चर्चा केली व अडचणी जाणून घेतल्या. मात्र, ठोस तोडगा निघालाच नसल्याचे सकल मराठा समाजाचे जिल्हा समन्वयक माऊली पवार यांनी सांगितले. 

ठळक बाबी... 
- पालकमंत्र्यांच्या हस्ते 18 सप्टेंबर रोजी वसतिगृहाचे मोठ्या दिमाखात उद्‌घाटन 
- उद्‌घाटनापासून आजतागायत वसतिगृहाच्या खोल्यांना कुलूपच 
- विद्यार्थ्यांचे वसतिगृहात राहण्याकरिता विद्यार्थ्यांचे हेलपाटे सुरूच 
- निर्वाह भत्ता न मिळाल्याने विद्यार्थ्यांकडून सात हजार रुपये फी ची मागणी 
- वसतिगृहात नाही विद्यार्थ्यांसाठी राहण्याची व स्वच्छतागृहाची पुरेशी सोय 

शासनाने नुसतीच वसतिगृहाची घोषणा केली. परंतु, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना त्याचे अर्ज कुठे मिळतात, त्यासाठी नेमकी काय प्रक्रिया आहे, याची माहितीच नाही. अर्ज असूनही ते उपलब्ध करून दिले जात नाहीत. शासनाकडून निर्वाह भत्ता मंजूर झाल्याशिवाय मोफत प्रवेश मिळणार नाही, असे विद्यार्थ्यांना सांगण्यात आले आहे. त्याबाबतीत तत्काळ तोडगा काढावा अन्यथा पुन्हा रस्त्यावर उतरावे लागेल. 
- माऊली पवार, जिल्हा समन्वयक, सकल मराठा समाज

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com