Life imprisonment for murder in land and house disputes case in Solapur
Life imprisonment for murder in land and house disputes case in Solapur

सोलापूर : जमीन व घराच्या वादातून खून केल्याप्रकरणात जन्मठेप 

सोलापूर : जमीन व घरच्या वादावरून खून केला प्रकरणात परमेश्वर मल्लेशी ख्याडगी ऊर्फ परमेश्वर गुरुलिंगप्पा लच्याण (वय 68, रा. नावंदगी ता. अक्कलकोट) यास जिल्हा न्यायाधीश एम. व्ही. मोरोळे यांनी जन्मठेप व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सोमवारी ठोठावली. 

आनुज शिवानंद लच्याण (वय 24, रा. नावंदगी ता. अक्कलकोट) यांनी फिर्याद दिली होती. याप्रकरणात ख्याडगी याच्यासह लक्ष्मण बिंदू जाधव, नरेंद्र जगदेव पाटील (रा. नावंदगी ता. अक्कलकोट) या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. शिवानंद इरण्णा लच्याण असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. आरोपी ख्याडगी याने बनावट कागदपत्रे तयार करून लच्याण कुटुंबातील वारसदार असल्याचे भासविले होते. तो अनधिकृतपणे घरात राहत होता. लच्याण कुटुंबाशी काही संबंध नसून तो तोतया आहे. घरासोबत तो शेतीवरही हक्क सांगत होता. त्याच्या विरोधात शिवानंद लच्याण यांनी न्यायालयात दावा दाखल केला होता. त्या दाव्याचा निकाल शिवानंद लच्याण यांच्या बाजूने लागला होता.

या कारणावरून गावातील लक्ष्मण जाधव व नरेंद्र पाटील हे परमेश्‍वर ख्याडगी यास भडकावित होते. ख्याडगी याने शिवानंद लच्याण यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी लच्याण यांना जिल्हाधिकारी कार्यालय आणि पोलिसात तक्रार दिली होती. 13 ऑगस्ट 2015 ला दुपारच्या सुमारास आरोपींनी जमीन व घराच्या कारणावरून शिवानंद यांना धारदार शस्त्राने व दगडाने मारून खून केला. याप्रकरणात पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. गुन्ह्यात जप्त केलेला चाकू आणि आरोपीच्या कपड्यावरील रक्ताचे डाग एकच होते.

परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे सरकारी वकिलांनी युक्तिवाद केला. न्यायालयाने ख्याडगी यास जन्मठेप व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास तीन महिने साधी कैद भोगावी लागेल असेही आदेशात म्हटले आहे. या गुन्ह्यातील लक्ष्मण जाधव व नरेंद्र पाटील या दोघांची पुराव्याअभावी सुटका करण्यात आली. 

यात सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंह राजपूत, सहायक सरकारी वकील माधुरी देशपांडे तर आरोपीतर्फे ऍड. व्ही.डी. फताटे, ऍड. मिलिंद थोबडे यांनी काम पाहिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com