मंगळवेढा : शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे कायम करण्यासाठी बैठक 

मंगळवेढा : शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे कायम करण्यासाठी बैठक 

मंगळवेढा - 'प्रधानमंत्री आवास' योजने अंतर्गत स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थांच्‍या क्षेत्रात असलेल्‍या शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे व नगरपरिषद मालकीच्‍या जागेवरील अतिक्रमणे कायम करण्यासाठी शासन निर्णयावर चर्चा नगरपरिषदेच्‍या सभागृहात बैठक घेण्यात आली.

यावेळी नगराध्‍यक्षा अरुणा माळी, उपनगराध्‍यक्ष चंद्रकांत घुले, पक्षनेते अजित जगताप, मुख्‍याधिकारी पल्‍लवी पाटील, प्रविण खवतोडे, सब्‍जपरी मकानदार, भागिरथी नागणे, अनिता नागणे, संकेत खटके, रतन पडवळे नगरसेविका, अनिल बोदाडे, नगरसेवक, बशीर बागवान, भारत नागणे, महादेव जाधव, अॅड विनायक नागणे, राहूल टाकणे, सोमनाथ माळी, चंद्रकांत पडवळे,तसेच नगरपरिषद अधिकारी रामभाऊ पवार, बाबासाहेब पवार, विनोद सर्वगोड, योगेश सुरवसे, अजिंक्‍य जाधव, अजिंक्‍य मोरे, गणेश माळी इत्‍यादी उपस्थित होते.

शहरांत नागणेवाडी तलाव परिसर, साठेनगर, भिमनगर, कृष्‍णतलाव, किल्‍ला भाग खंदक इत्‍यादी ठिकाणी अतिक्रमण करुन स्‍थायिक झालेल्‍या नागरीकांसाठी हा शासन निर्णय अत्‍यंत महत्‍वाचा यामध्‍ये 500 चौ. फुटापर्यंत जागा मोफत नियमानुकूल करणेत येणार असून 500 चौ.फुट ते 1000 चौ.फुटापर्यंतची जागा रेडी रेकनर दराच्‍या 10% रक्‍कम तसेच 1000 चौ.फुट ते 1500 चौ.फुटाच्या जागेसाठी 25% रक्‍कम शासनाकडे भरावी. यातील अतिक्रमणधारक नागरीकांमध्‍ये एससी, एसटी, ओबीसीसाठी या जागा मोफत देण्‍यांत येणार आहेत. तसेच पालिकेच्या मालकीच्‍या जमिनी बाबत प्रधानमंत्री आवास योजनेच्‍या पात्र लाभार्थ्‍यांना भाडेपट्टयाने देण्‍यासाठी भाडयाचा वार्षिक दर हा प्रति चौरस फुट एक रुपया इतका असेल आणि भाडेपट्टयाचा कालावधी 30 वर्षापेक्षा अधिक असणार नाही. या सर्व अतिक्रमण केलेल्‍या शासकीय व नगरपरिषद मालकीच्‍या जागेंचा प्रथम तातडीने सर्व्‍हे करून अतिक्रमणे कायम करणेकामी उपविभागीय अधिकारी सो, भूमी अभिलेख अधिकारी व  मुख्‍याधिकारी यांची समिती नियुक्‍त करणेत आली.

ज्‍यांना आपले अतिक्रमण नियमानुकूल करावयाचे आहे त्‍यांनी लेखी अर्ज, पती पत्‍नीचा एकत्रित दोन फोटो, व वैयक्तिक अर्जदाराचे तीन फोटो कुटूंबातील सदस्‍यांची संख्‍या, आधारकार्ड, 1.1.2011 पुर्वीचा व सध्‍या निवासास असल्‍यांचा पुरावा जोडून त्‍वरीत अर्ज करावेत.
- पल्लवी पाटील, मुख्याधिकारी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com