crime
crime

निपाणी : मनोरुग्णाचा नागरिकावर धारदार वस्तूने हल्ला

निपाणी : महामार्गाच्या सेवा रस्त्यावर सायंकाळी फिरायला जाणाऱ्या नागरिकावर एका मनोरुग्णाने ब्लेड सह धारदार वस्तू नी जीवघेणा हल्ला केल्याची घटना निपाणी येथील हालसिद्धनाथ कारखान्याजवळ रविवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास वाळवे मळ्याजवळ घडली. या हल्ल्यामध्ये सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना  येथील  खासगी रुग्णालयात  उपचारासाठी दाखल केले आहे .पोलीस उपनिरीक्षक ए. के.नदाफ व सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन मनोरुग्णाला ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे निपाणीसह उपनगरात खळबळ माजली आहे. 

याबाबत पोलीस ठाण्यासह घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, शहरासह रुपयातील नागरिक दररोज सायंकाळी साडेपाचनंतर शहरातील रस्त्यावर फिरावयास जातात. आज सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याच्या परिसरातील रस्त्यावर अनेक नागरिक इवनिंग वाकिंग साठी गेले होते. त्याचवेळी एका मनोरुग्णाने संजय महागावकर यांच्या पत्नीवर धारदार ब्लेडने वार केले. त्यातून पत्नीला सोडविण्यासाठी संजय यांनी मनोरुग्णाला अडविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांनी त्यांच्यावरही हल्ला चढविला. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांनी गर्दी करून मनोरुग्णाला अडविण्याचा प्रयत्न केला त्यावेळी आकाश मल्हारी यांच्यावरही त्याने ब्लेडने हल्ला केला. त्यामुळे भयभीत झालेल्या आकाश यांनी शेजारीच असलेल्या आपल्या घराकडे पळ काढला. पण सदर मनोरुग्णाने त्यांचा पाठलाग करून घरात घुसण्या सह घरातील साहित्याची नासधूस केली. शिवाय त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकीही दिली. तेथून बाहेर पडून पुन्हा रस्त्यावर येणाऱ्या नागरिकाशी हुज्जत घालून त्यांच्यावरही वार करण्याचा प्रयत्न केला. या थरार नाट्य मध्ये सहा जण जखमी झाले आहेत. पण रात्री उशिरापर्यंत त्यांची नावे समजू शकली नाही. 

घटनेची माहिती मिळताच येथील सामाजिक कार्यकर्ते संयोजित उर्फ निकु पाटील यांनी घटनास्थळी धाव घेऊन मनोरुग्णाला आवरण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर घटनेची माहिती बसवेश्वर चौक पोलिस ठाण्याला दिली. यावेळी पोलीस उपनिरीक्षक ए. के. नदाफ व सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन मनोरुग्णाला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केल्यानंतर तो चंदगड येथील रहिवाशी असून चिकोडी येथे एका हॉटेलमध्ये कुक म्हणून काम करत असल्याचे निष्पन्न झाले. काही घरगुती अडचणीमुळे तो मनोरुग्ण बनल्याचे पोलीस उपनिरीक्षक नदाफ यांनी सांगितले. त्याला अटक केल्यानंतर परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. यापुढील घटना टाळण्यासाठी पोलिसांनी अशा मनोरुग्णांचा बंदोबस्त करण्याची मागणी निकु पाटील यांनी केली. रात्री उशिरापर्यंत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com