सोलापूर जिल्ह्यात मोहोळचा पुन्हा वरचष्मा

सोलापूर जिल्ह्यात मोहोळचा पुन्हा वरचष्मा

मोहोळ : मोहोळ पुरवठा विभागाने तालुक्यातील रास्तभाव धान्य दुकानांच्या माध्यमातुन एकुण 29 हजार 420 शिधापत्रीका धारकांना धान्य वितरीत करून 90.3 इतकी टक्केवारी मिळवुन सोलापुर जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविल्याची माहिती तहसीलदार जीवन बनसोडे यांनी सकाळला दिली, त्यामुळे जिल्ह्यात मोहोळचा पुन्हा वरचष्मा राहिला आहे.

या संदर्भात माहिती देताना तहसीलदार बनसोडे म्हणाले, तालुक्यात एकुण 118 रास्तभाव धान्य दुकाने आहेत. 32 हजार 676 एकूण कार्डधारक आहेत. त्यापैकी अंत्योदय योजनेचे 2  हजार 948 तर अन्नसुरक्षा योजनेचे 31 हजार 150 लाभार्थी आहेत. विविध योजनेच्या सर्व कार्डधारकांना धान्य दुकानामार्फत विविध धान्य वितरीत केले जाते. सर्व धान्य ई पॉश यंत्राद्वारेच वितरीत केले जाते, त्यामुळे धान्य वितरणात पारदर्शकता आली असून बेकायदेशीर कृत्याला बऱ्यापैकी आळा बसला आहे.

दर महिन्याच्या प्रत्येक सात तारखेस अन्नदिन साजरा करण्यात येतो, तर प्रत्येक महिन्याच्या 8 ते 15 तारीख या कालावधीत अन्नसप्ताह साजरा करण्यात येतो. प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार जीवन बनसोडे यांच्या सुचनेनुसार प्रत्येक महिन्याला तालुक्यातील रास्तभाव धान्य दुकानदारांची बैठक आयोजित करुन, त्यात शासनाकडून प्राप्त झालेल्या नवीन नियमावलीची माहिती दिली जाते व त्या पद्धतीने कामकाज करण्यासाठी प्रबोधन केले जाते. तालुक्यात गॅस ग्राहकांची संख्या वाढल्याने केरोसीनच्या मागणीत घट झाली आहे, त्यामुळे तालुका शासनाच्या केरोसीन मुक्त गाव योजनेकडे वाटचाल करीत आहे.

तालुक्यातील 95 टक्के लाभार्थीचे आधार लिंक झाले आहे. जिल्हा पुरवठा विभागाकडून आलेल्या नवीन तंत्रज्ञान व नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाते. यासाठी पुरवठा निरीक्षक अनिल टेळे, पुरवठा अव्वल लिपीक श्रीमती एस. एन. बिज्जर गी, संगणक विभाग प्रमुख ए. एस. कुंभार हे परिश्रम घेत आहेत. प्रांताधिकारी सचिन ढोले, तहसीलदार जीवन बनसोडे यांनी पुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

शासनाकडून अन्नधान्य वितरणाबाबत पारित  झालेल्या नियमांची तातडीने अंमलबजावणी करण्यात तालुका अग्रेसर आहे. वेळोवेळी वरिष्ठांचे मार्गदर्शन मिळते.
- अनिल टेळे (पुरवठा निरीक्षक)

तालुक्यातील आधार लिंकचे काम 95 टक्के पूर्ण झाले आहे. यासाठी धान्य दुकानदारांचे मोठे सहकार्य मिळत आहे. अन्नदिन व अन्न सप्ताह प्राधान्याने साजरा केला जातो.
- श्रीमती एस. एन. बिज्जर गी (पुरवठा अव्वल लिपीक)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com