खासदारांच्या कार्यालयासमोर मौजे सोरडी ग्रामस्थांचे भजन 

खासदारांच्या कार्यालयासमोर मौजे सोरडी ग्रामस्थांचे भजन 

सांगली - दुष्काळी जत तालुक्‍यातील मौजे सोरडी गावचा म्हैसाळ सिंचन योजनेत समावेश करावा या मागणीसाठी ग्रामस्थांनी आजपासून कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष खासदार संजय पाटील यांच्या संपर्क कार्यालयासमोर भजन म्हणत उपोषण सुरू केले.

मौजे सोरडी गावचा म्हैसाळ योजनेत समावेश करण्यासाठी 15 वर्षाहून अधिक काळ चळवळ सुरू आहे. आंदोलने करून मोर्चे देखील काढण्यात आले. गावच्या इरिगेशन तलावात म्हैसाळचे पाणी न सोडल्यास आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा ठराव नुकतेच 26 जानेवारीच्या ग्रामसभेत केला आहे.

शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी वापराचा अधिकार मुलभूत गरजा भागवून कष्ट करून जगण्याच्या हक्काशी जोडला गेला पाहिजे. अग्रक्रमाने योजना तयार केली पाहिजे. या मागणीसाठी ग्रामस्थांनी 29 जानेवारीला निवेदन दिले होते. अन्यथा 7 फेब्रुवारीपासून खासदार पाटील यांच्या "काका भवन' या
कार्यालयासमोर बेमुदत उपोषण केले जाईल असा इशारा दिला होता.

त्यानुसार ग्रामस्थांनी माधवनगर रेल्वे उड्डाणपुलाजवळील "काका भवन' समोर दुपारपासून ठिय्या मारला. भजन गात त्यांनी आंदोलन सुरू केले आहे. ग्रामस्थांच्या आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर संजयनगर पोलिस ठाण्याचा बंदोबस्त तैनात केला आहे. जोपर्यंत म्हैसाळ योजनेत गावचा समावेश होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त
केला.

सरपंच दत्तात्रय चव्हाण, भागाप्पा सोलनकर, मोहनराव गायकवाड, बाळू आपटे, बी. डी. पाटील, अनिल चव्हाण आदींसह ग्रामस्थ आंदोलनात सहभागी झाले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com