रिक्षाचालकाच्या मुलाची राष्ट्रीय युवा पुरस्कारावर मोहर

रिक्षाचालकाच्या मुलाची राष्ट्रीय युवा पुरस्कारावर मोहर

कोल्हापूर - येथील ओंकार राजीव नवलिहाळकर यांची २०१६-१७ च्या राष्ट्रीय युवा पुरस्कारासाठी निवड झाली. केंद्रीय युवककल्याण व खेळ मंत्रालयाने याची घोषणा केली. पन्नास हजार रुपये, मेडल व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्काराने कोल्हापुराच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे. ‘आंतरराष्ट्रीय युवा’दिनी बारा ऑगस्टला पुरस्काराचे नवी दिल्ली येथे वितरण होणार आहे.

ओंकार मंत्रालयात आपत्ती व्यवस्थापन कक्ष अधिकारी आहेत. ते बापूरामनगरात राहत होते. त्याचे वडील राजीव रिक्षाचालक आहेत. तर आई खासगी संस्थेत नोकरीत होत्या. केंद्रीय महिला बजेट संदर्भात त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी १३ मिनिटे चर्चा केली आहे. मुंबईत मंत्रालयाला लागलेली आग विझविण्यात सर्वात पुढे ते होते. त्यांनीच अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित करून आग विझविल्याबद्दल खुद्द मुख्यमंत्री, अपर सचिव, महसूल मंत्र्यांनीही त्याला शाबासकी दिली होती. सध्या ते सत्तावीस वर्षाचे असून मुंबईत नोकरीसाठी राहत आहेत.
ओंकार यांच्या संपूर्ण जीवन प्रवास हा अत्यंत खडतर आहे.

लहानपणी आर्थिक परिस्थितीमुळे ओंकारच्या आई-वडिलांनी ओंकारला पाळणाघरात ठेवले. पाळणाघरात खेळता-खेळता एका मुलाने डोळ्यामध्ये टाचणी घातल्यामुळे ओंकारच्या डाव्या डोळ्याला अपंगत्व आले. लहानपणापासून देशाच्या संरक्षण क्षेत्रामध्ये भरती होण्याचे ओंकारची स्वप्न त्यामुळे भंगले होते, परंतु ओंकार यांनी जिद्द सोडली नाही त्यांनी कोल्हापुरातील अनेक आपत्कालीन सेवा संस्थांच्या माध्यमातून आपले समाज कार्य चालू ठेवले. त्यातूनच ओंकार यांनी आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अनेक परीक्षा दिल्या. त्यावेळी प्रशिक्षणासाठी जात असताना ओंकारच्या मनामध्ये डोळ्याविषयी थोडी भीती होती, परंतु तत्कालीन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी धनंजय पाटील यांनी त्याला या परीक्षा देण्यासाठी प्रोत्साहित केले. एका डोळ्याने दिव्यांग असूनदेखील ओंकारने राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या झालेल्या प्रशिक्षणात संपूर्ण महाराष्ट्रातून ओंकार यांचा प्रथम क्रमांक आला. 

संसदवारी उपक्रमांतर्गत ओंकार यांनी दोन ऑगस्ट २०१८ मध्ये पंतप्रधानांची भेट घेतली होती. त्यांनीही त्याच्या कामाबद्दल कौतुक केले होते. ओंकार काही वर्ष कोल्हापुरातील आपत्कालीन सेवा संस्थांच्या माध्यमातून त्यांनी समाजसेवी उपक्रमांमध्ये कार्यरत आहेत. येथील ‘जीवन ज्योत’ आपत्कालीन सेवा संस्था, ‘जीवन मुक्ती’ आपत्कालीन सेवा संस्था यांच्यासोबत त्यांनी अनेक वेळेला अनेक लोकांचे जीव वाचवण्याचे काम केले आहे. त्याच बरोबर तंबाखूमुक्त शाळांचे महाराष्ट्र राज्य या उपक्रमांतर्गतदेखील कोल्हापुरातील शाळा तंबाखूमुक्त करण्यासाठी योगदान दिले आहे. मुंबई येथील ‘सलाम मुंबई फाऊंडेशन’च्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूरमधील शाळा तंबाखूमुक्त करण्यासाठी योगदान दिले. 

‘सकाळ’मुळे मिळाले प्रोत्साहन
वेगळ्या वाटेवर चालणाऱ्या व्यक्तींवर आधारित ‘अवलिया’ हे सदर ‘सकाळ’मध्ये गेल्या काही वर्षापूर्वी सुरू होते. त्यामध्ये ओंकार राजीव नवलिहाळकर यांचा खडतर प्रवास आणि त्यांच्या जिद्दीवर कॉलम प्रसिद्ध झाला होता. ओंकार यांच्या आयुष्यातील ही पहिली प्रसिद्धी होती. त्याचीही आठवण करून ओंकार यांनी आज ‘सकाळ’ने दिलेल्या प्रोत्साहनमुळे या यशापर्यंत पोचल्याचे ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com