सांगली मार्केट यार्डातील चोरीप्रकरणी एकास अटक

सांगली मार्केट यार्डातील चोरीप्रकरणी एकास अटक

सांगली - येथील वसंतदादा मार्केट यार्ड मसाल्याचे गोडावूनमधून चोरी करणाऱ्या एकास विश्रामबाग पोलिसांनी अटक केली. नितीन संजय झेंडे (22, माकडवाले गल्ली) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून 26 हजाराच्या रोकडसह पन्नास हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी दोन अल्पवयीन मुलांनाही ताब्यात घेतले असून त्यांची सुधारगृहात रवानगी करण्यात आली. 

अधिक माहिती अशी, की मार्केट यार्ड तिसऱ्या गल्लीतील संगमेश्‍वर स्पायसेय नावाचे मसाल्याचे गोडावून आहे. 20 सप्टेंबरला मध्यरात्री चोरट्यांनी छताचा पत्रा उचकटुन चोरी केल्याचे उघडकीस आले. त्यानंतर विश्रामबाग पोलिसांनी तपासाची सुत्रे हलवली. यात माकडवाले गल्लीतील नितीन झेंडे याचा समावेश असल्याचे समोर आले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेवून चौकशी केली असता चोरीची कबुली दिली. त्याच्याकडून 26 हजार रोख, डीव्हीआर मशीन, सीसीटीव्ही कॅमेरा, एलईडी टीव्ही असा पन्नास हजारांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला. 

पोलिस निरीक्षक अनिल तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्ष कोळेकर, वसंत किर्वे, अमोल भोळे, दीपक परीट, रोहित माने, ऋतुराज होळकर, निवास माने, मल्लाप्पा कट्टीमणी यांचा कारवाईत सहभाग होता. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com