औदुंबर पाटील, हसबनीस, भागवत यांच्या बदल्या

औदुंबर पाटील, हसबनीस, भागवत यांच्या बदल्या

कोल्हापूर - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर कोल्हापूर परिक्षेत्र अंतर्गत जिल्ह्यातील पोलिस निरीक्षक औदुंबर पाटील, बिपीन हसबनीस, संदीप भागवतसह सहायक पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षक अशा १७ जणांच्या बदल्या झाल्या. बाहेर जिल्ह्यातून १६ अधिकारी जिल्ह्यात बदली होऊन आले. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांच्या आदेशानुसार या बदल्या  झाल्या. 

जिल्ह्यातील कार्यकाल पूर्ण झालेल्या, स्वजिल्ह्यात असलेल्या अधिकाऱ्यांच्या बदलीची प्रक्रिया सुरू आहे. यातील पहिली यादी आज जाहीर झाली. यात वादग्रस्त ठरलेले राजारामपुरी पोलिस ठाण्याचे तत्कालीन पोलिस निरीक्षक औदुंबर पाटील यांची सध्या मुख्यालयात नेमणूक होती. त्यांची पुणे ग्रामीण येथे बदली झाली, तर गडहिंग्लज पोलिस ठाण्याचे तत्कालीन पोलिस निरीक्षक बिपीन हसबनीस यांची सांगली येथे बदली झाली.

जिल्ह्यात पोलिस निरीक्षक ईश्‍वर ओमासे व प्रकाश गायकवाड हे बदली होऊन आले आहेत. परिक्षेत्रात एकूण ७२ अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. त्यात २० पोलिस निरीक्षक, १० सहायक पोलिस निरीक्षक आणि ४२ पोलिस उपनिरीक्षकांचा 
समावेश आहे. 

उपनिरीक्षकांच्या बदल्या अशा : कंसात बदल्यांची ठिकाणे
ज्योत्स्ना भांबिष्टे (सातारा), भरत पाटील (सातारा), दिलीप ढेरे (सांगली), समिक्षा पाटील (सातारा), महादेव जठार (सांगली), अजित पाटील (सांगली), रोहिदास पवार (सांगली), उदय दळवी (सातारा), गणेश माने (सांगली), अक्षयकुमार ठिकणे (सांगली), राजू डांगे (प्रशिक्षणार्थी) (सातारा), प्रवीण जाधव (प्रशिक्षणार्थी) (सातारा).

 जिल्ह्यात बदलून आलेले पोलिस निरीक्षक 
ईश्‍वर ओमासे (सोलापूर ग्रामीण), प्रकाश गायकवाड (सांगली), सहायक पोलिस निरीक्षक अविनाश माने (सोलापूर ग्रामीण). 

 उपनिरीक्षक असे
अजित भोसले (सांगली), नंदकुमार सोनवलकर (सांगली), सचिन वसमळे (सांगली), योगेश पाटील (सांगली), प्रियंका सराटे, (सांगली), सुजाता पाटील (सांगली), प्रमोद कदम (सातारा), नसिमखान फरास (सातारा), विजय चव्हाण (सातारा), सुनील पवार (सातारा), अनिल चौधरी (सातारा), विलास कुबडे (सातारा), पोपट कदम (सातारा).

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com