'सोन्या गणपती'ने व्यक्त केली पोलिसांप्रती कृतज्ञता 

Sakal medias fit program nutritious food allocation at solapur
Sakal medias fit program nutritious food allocation at solapur

सोलापूर : नागरिकांच्या सुरक्षेसाठी ऑन ड्यूटी चोवीस तास दक्ष असणाऱ्या पोलिस बांधवांप्रती कृतज्ञता व्यक्त करत शिवाजी चौकातील सोन्या गणपती प्रतिष्ठानच्या वतीने सकाळ माध्यम समूहाचा तंदुरुस्त बंदोबस्त उपक्रम राबविला. पोलिस आयुक्त महादेव तांबडे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत गुरुवारी पौष्टिक आहार वाटप करण्यात आला. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते गणेशाची आरती करण्यात आली. त्यानंतर पोलिसांना पौष्टिक आहार वाटप करण्यात आला. यावेळी गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सूर्यकांत पाटील, फौजदार चावडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय जगताप, शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलिस निरीक्षक कमलाकर पाटील, सहायक पोलिस निरीक्षक विजयानंद पाटील, पोलिस उपनिरीक्षक हर्षा कांबळे, सोन्या गणपती प्रतिष्ठान मंडळाचे आधारस्तंभ शंतनू साळुंखे आदी उपस्थित होते.

'सकाळ'चे सहयोगी संपादक अभय दिवाणजी यांनी तंदुरुस्त बंदोबस्त उपक्रमाविषयी माहिती दिली. याप्रसंगी 'सकाळ'चे वितरण व्यवस्थापक संजय पवार, सोन्या गणपती प्रतिष्ठान मंडळाचे प्रमुख संस्थापक संतोष साळुंके, हरिभाऊ पवार, अजितसिंग चव्हाण, प्रभाकर माने, विशाल कणसे, पवनसिंग चव्हाण, सुशांत पुणेकर, उत्सव अध्यक्ष सागर जाधव, उपाध्यक्ष किरण माने, जावेद जमादार, खजिनदार रोहित पवार, सहखजिनदार प्रदीप ताकभाते, कार्याध्यक्ष आकाश ताटवे, सहकार्याध्यक्ष पराग चव्हाण, सचिव सागर गवळी, सहसचिव हारुन शेख, पूजा प्रमुख ओंकार दळवे, आशिष अवताडे, प्रसिद्धी प्रमुख मयूर पवार, गजानन गोविंदकर, माऊली भुतकर, प्रवीण कदम, अमर जाधव आदी उपस्थित होते. मंडळाचे प्रमुख कार्यकर्ते अमित केसकर यांनी सूत्रसंचालन केले. 

ननवरे कुटुंबीयांना मदतीचा हात -
सोन्या गणपती प्रतिष्ठानच्या वतीने अपघाती मृत्यू झालेल्या हवालदार नागनाथ ननवरे यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत दिली. मान्यवरांच्या हस्ते ननवरे यांचे चिरंजीव पवन ननवरे यांच्याकडे मदत सुर्पूद केली. यावेळी पोलिस आयुक्त तांबडे यांनी पवन ननवरे यांना पोलिस दलात भरती करून घेणार असल्याचे सांगितले. 

'सकाळ' नेहमीच सकारात्मक उपक्रम राबवित असतो. तंदुरुस्त बंदोबस्त उपक्रमातून पोलिसांप्रती कृतज्ञता व्यक्त होत आहे. सोन्या गणपती प्रतिष्ठानने पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा केला. मिरवणूक न काढता जागेवर विसर्जन करण्यात येणार आहे, हा आदर्श इतर मंडळांनी घ्यायला हवा. 
- महादेव तांबडे, पोलिस आयुक्त

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com