...अन्‌ नानांनी मारली समृद्धी जाधवांना मिठी!

घारेवाडी - दोन मिनिटांच्या वक्तृत्वात समृद्धी जाधवांनी नाना पाटेकरांचे मन जिंकल्याने त्यांनी मिठी मारून कृतज्ञता व्यक्त केली.
घारेवाडी - दोन मिनिटांच्या वक्तृत्वात समृद्धी जाधवांनी नाना पाटेकरांचे मन जिंकल्याने त्यांनी मिठी मारून कृतज्ञता व्यक्त केली.

कऱ्हाड - घारेवाडी (ता. कऱ्हाड) येथे सुरू असलेल्या बलशाली युवा हृदय संमेलनात नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी राज्यातील तरुणाईला मार्गदर्शन केले. त्या कार्यक्रमाचे आभार मानताना चित्रपट अभिनेते समृद्धी जाधवांनी आपल्या वक्तृत्वाने पाटेकरांचे मनच जिंकले. श्री. जाधव यांच्या शब्दांच्या फेकीवर खुद्द पाटेकर फिदा झाल्याने जाधव यांना पाटेकर यांनी मिठी मारून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.   

संमेलनात नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांना निमंत्रित करण्यात आले होते. आपल्या खुमासदार शैलीत दोन्ही कलाकारांनी युवकांना मंत्रमुग्ध केले. या कार्यक्रमाचे आभार मानण्याचे काम समृद्धी जाधव यांच्याकडे होते. आभार मानताना त्यांनी आपल्या अमोघ वाणीने केलेल्या वक्तृत्वावर खुद्द नाना फिदा झाले. जाधव यांच्या दोन मिनिटांच्या वक्तृत्वाने पाटेकरांचे मन जिंकले. 

जाधव यांनी लहानपणी आपण शाळेत जायला निघायचो. आई सजवायची. डबा भरून पाठीवर दप्तर द्यायची. शाळेत निघालो की आई पिलू इकडे ये म्हणून काजळाची तिट लावायची. का तर दृष्ट लागू नये म्हणून. आज काजळाच्या जागी मी आहे. त्यामुळे पाटेकर, अनासपुरे आणि इंद्रजित देशमुख यांच्या कार्याला कधीच दृष्ट लागणार नाही, असे म्हणताच पाटेकर यांनी जाधव यांना मिठी मारली. तेव्हा उपस्थित हजारो तरुण-तरुणींनी टाळ्यांचा गजर केला. कार्यक्रमस्थळी त्यांच्या आभाराची आणि नानांनी त्यांना मारलेल्या मिठीचीच चर्चा सुरू होती.

चित्रपट क्षेत्रातील एवढ्या मोठ्या कलाकाराने माझ्यासारख्या एका छोट्या कलाकाराच्या वक्तृत्वाला दाद देवून मला मारलेली मिठी ही माझ्यासाठी फार मोठी गोष्ट असून त्यासाठी शिवमने मला दिलेले व्यासपीठ हेही महत्त्वाचे आहे. रूपेरी पडद्यावर ज्यांना कठोर मनाचे कलाकार म्हणून पाहतो, त्यांचे मन किती संवेदनशील आहे, याचीही मला प्रचिती आली.
- समृद्धी जाधव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com