सातारा जिल्हा रुग्णालयात चक्क कचरा डेपो!

सातारा - जिल्हा रुग्णालयातील शवविच्छेदनगृहाजवळ पडलेला कचऱ्याचा ढीग.
सातारा - जिल्हा रुग्णालयातील शवविच्छेदनगृहाजवळ पडलेला कचऱ्याचा ढीग.

सातारा - जिल्हा रुग्णालयातील शवविच्छेदनगृहाजवळ कचरा डेपो केल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. मृतांच्या नातेवाईकांबरोबरच परिसरातील नागरिकांनाही याचा त्रास होत आहे. जिल्हा शल्यचिकित्सकांनी याबाबत तातडीने निर्णय घेण्याची मागणी होत आहे.

जिल्हा रुग्णालयातील शवविच्छेनगृह म्हणजे दुर्गंधीचे आगार अशीच काही वर्षांपूर्वीची परिस्थिती होती. बेवारस मृतदेह तीन दिवस ठेवावा लागतो. अशा परिस्थितीत वातानुकुलित सुविधा नसल्यामुळे या दुर्गंधीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत होती. मात्र, डॉ. सुरेश जगदाळे यांनी जिल्हा शल्यचिकित्सक असताना ही परिस्थिती बदलली. शवविच्छेदनगृहाचे नूतनीकरण झाले. वातानुकुलित यंत्रणा बसविली. त्यामुळे या परिसरातील दुर्गंधी कमी झाली. त्यामुळे परिसरातील नागरिकांनाही हायसे वाटले. परंतु, आता पुन्हा एकदा या परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरत आहे.

शवविच्छेदनगृहाच्या जवळील मोकळ्या जागेला जिल्हा रुग्णालय व्यवस्थापनाने कचरा डेपोचे स्वरूप दिले आहे. रुग्णालयातील कचरा या मोकळ्या जागेत मोठ्या प्रमाणावर डंपिंग होत आहे. त्यामुळे कचऱ्याचे ढीग त्याठिकाणी लागलेले आहेत. बऱ्याच दिवसांपासून तो कचरा उचलला गेला नाही. त्यातच पाऊस पडल्यामुळे संपूर्ण कचरा भिजला. त्यातून दुर्गंधीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. शवविच्छेदनगृहामध्ये एखादा मृतदेह आल्यानंतर त्यांचे नातेवाईक व मित्र मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी येत असतात. त्यांना या दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. त्याचबरोबर या ठिकाणाला लागूनच काही गृहनिर्माण सोसायट्या आहेत. तेथील रहिवाशांनाही याचा त्रास होऊ लागला आहे.

त्यांना या दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. त्याचबरोबर या ठिकाणाला लागूनच काही गृहनिर्माण सोसायट्या आहेत. तेथील रहिवाशांनाही याचा त्रास होऊ लागला आहे. वाऱ्यामुळे दुर्गंधी पसरून रुग्णालयात येणाऱ्या रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनाही याचा त्रास होत आहे. नागरिक व रुग्णांची होणारी ही परवड थांबविण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सकांनी तातडीने पावले उचलणे आवश्‍यक आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com