खेळांच्या प्रोत्साहनासाठी शाळा, कॉलेजना निधी 

खेळांच्या प्रोत्साहनासाठी शाळा, कॉलेजना निधी 

कऱ्हाड - खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना शासनाकडून निधी देण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्याअंतर्गत राज्यातील जिल्हा, राज्य व आंतरराष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेत प्रावीण्य मिळवणाऱ्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना दोन कोटी २३ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. शासनाकडून लवकरच तो निधी शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना वितरित करण्यात येणार आहे. 

अलीकडे खेळांकडे दुर्लक्ष होऊ लागले आहे. अनेक शाळांना तर क्रीडांगणच नसल्याचे शिक्षण विभागाने केलेल्या पाहणीत आढळून आले आहे. त्यामुळे शाळांतून खेळावरही निर्बंध आलेले आहेत. शालेय स्तरावर विद्यार्थ्यांना खेळाडू म्हणून घडवण्यासाठी योग्य ती पावले टाकल्यास राज्य, राष्ट्रीय स्तरावरही विद्यार्थी चमकू शकतात, हे काही शाळांनी दाखवून दिले आहे.  मात्र, शाळांना आवश्‍यक त्या सुविधा निर्माण करण्यासाठी, खेळाडूंसाठी निधीची कमतरता होती. त्यामुळे अनेक शाळांना लोकसहभाग घेऊन, काहींना उद्योजक, व्यापारी अन्य दातृत्व असलेल्यांना दत्तक देवून खेळाडू घडवण्याचे काम केले आहे. त्याची दखल घेऊन शासनानेही आता एक पाऊल पुढे टाकले आहे. शाळांतून, कनिष्ठ महाविद्यालयांतून खेळाडू घडावेत, त्यांना प्रोत्साहन मिळावे आणि त्यातून जास्तीत जास्त खेळाडू घडावेत, या उदात्त हेतूने शासनाने खेळांना प्रोत्साहन मिळावे यासाठी माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना निधी देण्याचा चांगला निर्णय घेतला आहे. त्याअंतर्गत राज्यातील ज्या शाळांतील खेळाडूंनी जिल्हा, राज्य व आंतरराष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेत प्रावीण्य मिळवले आहे, त्या शाळांना व कनिष्ठ महाविद्यालयांना दोन कोटी २३ लाख रुपये निधी लवकरच वितरण करण्यात येणार आहे. शासनाकडून लवकरच तो निधी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडून शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना वितरित करण्यात येणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com