कर्नाळ रस्त्यावरील एका वसतिगृहातील मुलींचा लैंगिक छळ

कर्नाळ रस्त्यावरील एका वसतिगृहातील मुलींचा लैंगिक छळ

सांगली - कर्नाळ रस्त्यावरील एका वसतिगृहातील मुलींचा लैंगिक छळ झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीने सांगली शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. याप्रकरणी मुख्य संशयित संजय अरुण किणीकर, त्याची पत्नी वर्षाराणी संजय किणीकर यांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की येथील कर्नाळ रस्त्यावर मुलींचे वसतिगृह आहे. वसतिगृहात पहिली ते दहावीच्या विद्यार्थिनी असतात. संजय किणीकर व त्याची पत्नी वर्षाराणी हे तेथे देखरेखीस आहेत. सध्या वसतिगृहात २३ मुली आहेत. वसतिगृहात मुलींच्या खोलीच्या दरवाजाची कडी लागत नसल्याने मुली रात्री दरवाजा पुढे करून झोपतात. वसतिगृहातच एका खोलीत संजय किणीकर व वर्षाराणी किणीकर हे राहतात. रात्रीच्या वेळी संजय किणीकर हा तेथे फिरत असतो. चार महिन्यांपूर्वी किणीकर मुलीकडे वाईट नजरेने एकटक पाहत थांबला. या प्रकारामुळे पीडित मुलगी घाबरून खोलीत येऊन झोपली. पीडित मुलीने हा सर्व प्रकार खोलीतील इतर मुलींना सांगितला. यावेळी त्यातील काही मुलींनीही किणीकरबद्दल तक्रार केली.

नोव्हेंबर २०१८ मध्ये रात्री ९ वाजता जेवण करून मुली झोपल्या होत्या. यावेळी किणीकर हा मुलींच्या खोलीत आला. त्यावेळीही त्याने लैंगिक छळ केला. पीडितेने त्याच्यापासून सुटका करून घेतली. त्यानंतर काही दिवसांनी वर्षाराणी किणीकर हिने मुलींना बोलावून घेतले. मारण्याची धमकी दिली. या भीतीपोटी मुलींनी हा प्रकार कुणाला सांगितला नाही.

दरम्यान, एका मुलीचे आई-वडील भेटायला आले. त्यावेळी त्या मुलीने आई-वडिलांना हा प्रकार सांगितला. त्यांनी पीडित मुलीच्या पालकांना ही घटना सांगितली. त्यानंतर त्यांनी तत्काळ सांगलीत येऊन याप्रकरणी सांगली शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com