हणबरवाडी-धनगरवाडी योजनेचे पाणी विधानसभा निवडणूकीपूर्वी मिळणार : चरेगावकर

karhad
karhad

कऱ्हाड : दोन्ही काँग्रेसच्या निष्क्रीयतेमुळे कऱ्हाड उत्तरमधील अनक वर्ष रखडलेल्या हणबरवाडी - धनगरवाडी योजनेचे पाणी येत्या विधानसभा निवडणूकीपूर्वी 206 हेक्टर क्षेत्राला मिळेल, असा विश्‍वास रज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर यांनी आज येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केला. 

कऱ्हाड उत्तरमधील विविध कामांसंदर्भात अधिकाऱ्यांसमवेत शासकीय विश्रामगृहात आयोजित बैठीकनंतर चरेगावकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी कऱ्हाड उत्तरचे मनोज घोरपडे, जितेंद्र पवार, रामकृष्ण वेताळ, जिल्हा परिषद सद्सय सागर शिवदास, चंद्राकांत मदने, सुरेश कुंभार, मोहन जाधव, हिंदुराव चव्हाण, महेश जाधव आदी उपस्थित होते. 

चरेगावकर म्हणाले, काँग्रेस व राष्‍ट्रवादीच्या निष्क्रीयेमुळेच योजना रखडली, त्यामुळे शेतकरी पाण्यापासून वंचित राहिला. 2000 मध्ये या योजनांना प्रशासकीय मान्यता मिळाली, मात्र 2018 पर्यंत सरकारने ठोस कार्यवाही केली नाही. त्यामुळेच शासनाकडू पाठपुरावा करून योजनेसाठी  15 कोटी आणले. त्यातून दहा कोटींची कामे झाली आहेत. येत्या विधानसभा निवडणूकीपूर्वी  हणबरवाडी - धनगरवाडी योजेनेचे 206 हेक्टर क्षेत्राला पाणी देण्याचो कृती आराखडा केला आहे. तशा अधिकाऱ्यांना सूचनाही देण्यात आल्या आहेत. हणबरवाडीसाठी 50 कोटींचा निधी तातडीने देवून योजना गतीमान करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत. मेरवेवाडी तलावात टेंभू योजनेचे पाणी सोडण्यासंदर्भात निधीचा अडसर होती. त्याबाबत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दूर करून टंचाई निधीची तरतूद करून तलावात पाणी सोडण्याच्या सूचना केल्या आहेत. मदत व पुनर्रवर्सनमधून सुमारे एक कोटीची तरतूद केली आहे. त्यात शामगावचा  समावेश करण्याचा कृती आराखडा तयार केला असून त्यावरही चर्चा झाली. उरमोडीचा उजवा कालव्यासाठी शासनाने जलसंपदातून सुमारे 100 कोटींची तरतूद केली आहे. बंदीस्त पाईपलाईनद्वारे पाणी दिले जाणार असून डिसेंबरअखेर निविदा प्रक्रीया पूर्ण होवून कामास सुरवात होईल. सोनापूर व अंतवडी येथील एमआय टँक उभारण्याचा शासन निर्णय झाला आहे. सोनापूर येथील टँकच्या कामाला प्रशासकीय मान्यता मिळाली असून अंतवडी साठी वन विभागाकडे पाठपुरावा सुरू आहे. 

ते म्हणाले, कऱ्हाड शहरात भैरोबा गल्ली भागात टेंभूचे पाण्यामुळे जमिनीच धूप होते. त्याबाबत महसूलमंत्री पाटील यांनी सूचना केल्याने तेथे संरक्षणासाठी अडीच कोटींच्या कामाचे अंदाजपत्रक तयार केले आहे. त्याचे कामही लवकरच सुरू होईल. आटके येथे सुमारे 250 एकरात पाण्याच्या निचऱ्या अभवी नापीक झालेल्या जमिनीचा प्रश्‍नही मंत्री पाटील यांच्यामार्फत मार्गी लागणार असून तेथील पाण्याचा निचरा करून ते नदीपात्रात सोडण्याच्या कामाच्या प्रस्ताव सध्या मंत्रालयात आहे. त्यास लवकरच मंजुरी मिळेल.       

सरकार निष्क्रीय नव्हे गतिमान
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हणबरवाडी - धनगरवाडी योजनेसाठी दरवर्षी दहा कोटींचा निधी दिला असता तरी योजना पूर्णत्वास गेली असती, असा टोला लागवून चरेगावकर यांनी भाजप सरकार संवदेनशील असून प्रलंबित प्रश्‍न सोडवत असल्याचे सांगितले. ते म्हणाले, कऱ्हाड दक्षिण - उत्तेरचे लोकप्रतिनिधींनी विकासकामांची उदघाटन, भूमिपूजन करत आहेत, तर दुसरीकडे सरकार निष्क्रीय असल्याची टीका करत आहेत. मात्र उद्घाटने व भूमिपूजन होणारी कामे सरकारच्या पैशांतून होत असताना सरकार निष्‍क्रीय कसे? उलट यातून सरकारची गतीमानता दिसते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com