उदयनराजे आणि आमची दोन घराणी नाहीत- शिवेंद्रसिंहराजे

 उदयनराजे आणि आमची दोन घराणी नाहीत- शिवेंद्रसिंहराजे

सातारा- शिवेंद्रराजे आणि उदयनराजे यांच्यातील वाद मिटण्याचे संकेत खुद्द शिवेंद्रराजे भोसले यांनी दिले आहेत. मला फक्त आमदारकीत रस आहे. त्यामुळे मी विधानसभेची तयारी करत आहे, असे शिवेंद्रसिंहराजेंनी म्हटले आहे. त्याचबरोबर, आमची दोन घराणी नाहीत, घराणं असल्याचे स्पष्टीकरण त्यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना दिले आहे.

छत्रपतींचं घराणं एकच आहे. त्या घराण्याच्या प्रतिष्ठेला धक्का लागेल, अशी कोणतीही कृती माझ्याकडून घडणार नाही, अशा शब्दांमध्ये त्यांनी उदयनराजेंसोबतचा वाद मिटवण्याचे संकेत दिले. शिवेंद्रसिंहराजे आणि उदयनेराजे या दोन छत्रपतींमधील वाद संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे. काही दिवसांपूर्वीच हे दोघेजण एका कार्यक्रमात आमने-सामने आले होते. त्यावेळी त्यांनी एकमेकांची चौकशी केली होती. त्यावेळी झालेला संवाददेखील शिवेंद्रसिंहराजेंनी सांगितला. 

छत्रपतींच्या घराण्यातील असल्यानं आम्हाला मोठं वलय मिळालं आहे. आम्ही आमदार-खासदार आहोत म्हणून आम्हाला मान-सन्मान मिळतो अशातला भाग नाही. तर छत्रपतींच्या घराण्यातील व्यक्ती असल्यानं आम्हाला प्रतिष्ठा मिळते. आमची दोन घराणी नाहीत. आमचं घराणं एकच आहे आणि ते म्हणजे छत्रपतींचं घराणं. या घराण्याच्या प्रतिष्ठेला माझ्या वर्तणुकीमुळे कधीही धक्का लागू देणार नाही. छत्रपतींच्या घराण्यातले असल्यानं लोकांना आमच्यावर विश्वास आहे. त्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, असेही शिवेंद्रसिंहराजे म्हणाले. लोकांपेक्षा कोणीही मोठा नसल्याचे स्पष्टीकरणदेखिल त्यांनी यावेळी दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com