युट्यूबवर गाजतेय सोलापुरी वर्गणी!

युट्यूबवर गाजतेय सोलापुरी वर्गणी!

सोलापूर : सोलापुरात उत्सवाच्या कालावधीत वर्गणी मागायला येणाऱ्या कार्यकर्त्यांसोबतचा संवाद सर्वांनाच माहिती आहे. प्रेमाने दमदाटी करून वर्गणी गोळा करणारे कार्यकर्ते आपल्यापैकी अनेकांनी अनुभवले आहेत. वर्गणी मागायला गेल्यानंतर कार्यकर्त्यांसोबतचा संवाद कसा असतो हे सोलापुरातील तरुणांनी सोलापुरी वर्गणी या शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून मांडला आहे.

आजवर अडीच लाख लोकांनी ही शॉर्ट फिल्म पाहिली आहे. 

इम्पॅक्‍ट मोशन फिल्म्स आणि लेन्स ऑन व्हिल्स आर्ट एक्‍स्प्रेस यांनी सोलापुरी वर्गणी ही शॉर्ट फिल्म 31 ऑगस्ट रोजी युट्यूबटवर रिलीज करण्यात आली. ओ काका हाय का घरी.., ए टकल्या.., ओ काका बर्री व्हरग..! असे म्हणत या शॉर्ट फिल्मला सुरवात होते. वर्गणी मागायला आलेल्या तरुण कार्यकर्त्यांना उद्देशून सोलापुरी कानडी मिश्रित मराठी भाषेत "काय रे सक्कासक्काळी लोकांचं डोकं खातावं... काय पाहिजे तुम्हाला..' असे म्हणून शॉर्ट फिल्ममधील मुख्य पात्र असलेले काका प्रश्‍न करतात. त्यावर कार्यकर्ते वर्गणी द्या म्हणून वाद घालतात.. आणि मग पुढे काय होते हे पाहताना मज्जा येते.

या शॉर्ट फिल्मचे दिग्दर्शन ओंकार हलखेडे यांनी केले आहे. छायाचित्रीकरण कौस्तुभ बारगजे यांनी केले आहे. यात गौरव मोरे, स्वप्नील वाघमारे, प्रसाद लिमये, श्रीनिवास कुनी, अजिंक्‍य सातपुते, ओंकार औरसंग आणि गणेश निकंबे यांनी भूमिका केली आहे. 

सोलापुरी भाषा आवडल्याने आजवर जवळपास अडीच लाख लोकांनी ही शॉर्ट फिल्म पाहिली आहे. सोशल मीडीयावर मोठ्या प्रमाणात शेअरही होत आहे. एक हजार पेक्षा अधिक कॉमेंट आल्या असून सोलापुरी वर्गणीला परदेशातही दाद मिळत आहे. सोलापुरी वर्गणी या शॉर्ट फिल्मला प्रतिसाद मिळाल्यानंतर शनिवारी वर्गणी रिटर्न नावाने दुसरी शॉर्ट फिल्म रिलीज करण्यात आली आहे. यातील गमतीशीर प्रसंग सर्वांनाच हसवत आहेत. अभियांत्रिकी शिक्षणानंतर लाइव्ह ऍक्‍शन डायरेक्‍टर हा कोर्स केलेल्या तरुणांनी आजवर अनेक शॉर्ट फिल्म केल्या असून त्या इम्पॅक्‍ट मोशन फिल्म्स या यूट्यूब चॅनेलवर पाहता येतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com