चालक बनला एस. टी. बसचा पालक

चालक बनला एस. टी. बसचा पालक

कोल्हापूर - एस.टी. कर्मचाऱ्यांनी एसटीकडे फक्त नोकरी म्हणून न बघता आपुलकीने पहिले तर काय होऊ शकते, याचे उदाहरण कोल्हापूरच्या संभाजीनगर आगारातील चालक बाळासाहेब कांबळे यांनी दाखवून दिले आहे. त्यांनी आगारातील दोन एसटी बस दत्तक घेऊन त्यांचा कायापालट केला आहे. चालकाला बस दत्तक देण्याचा हा राज्यातील पहिलाच उपक्रम आहे. एसटीला गतलौकिक मिळवून देण्यासाठी बाळासाहेब कांबळे यांनी उचलेले पाउल कौतुकास्पद ठरत आहे.

ग्रामीण भागात धावणारी एसटी म्हटली की फुटक्‍या काचा, फाटक्‍या सीट अशीच प्रतिमा अलीकडे तयार झाली आहे. यात भर म्हणजे एसटी कर्मचाऱ्यांनाकडून मिळणाऱ्या लहरी वागणुकीची. या सर्वाचा परिणाम म्हणजे एसटीच्या प्रवाशांची संख्या कमी होऊन एसटीचे उत्पन्न घटले. प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीद वाक्‍य घेऊन धावणारी एसटी खऱ्या अर्थाने सेवा देणारी ठरावी, असा प्रयत्न संभाजीनगर आगराकडील चालक बाळासाहेब कांबळे करत आहेत. 

गेल्या १९ वर्षांपासून एसटीमध्ये विना अपघात सेवा देणाऱ्या कांबळे यांनी प्रवाशांना चांगली सेवा देणे व एसटीचे आर्थिक उत्पन्न वाढवण्याच्या हेतूने आगारातील दोन एसटी दत्तक घेऊन त्याचा कायापालट केला आहे. यासाठी त्यांना आगार व्यवस्थापकांचे विशेष सहकार्य मिळाले आहे. 

खाजगी बसमध्ये ही उपलब्ध होणार नाहीत, अशा सेवा त्यांनी एसटीमध्ये उपलब्ध करून दिल्या आहेत. एसटीची अंतर्गत व बाह्य सजावटीद्वारे त्यांनी प्रवाशांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. यासाठी स्वतःच्या खिशातील काही रक्कम त्यांनी खर्ची घातली आहे.तर काही कामे एसटी वर्क शॉपमधून त्यांना हवी, तशी करून घेतली आहेत. जेणेकरून प्रवासादरम्यान एसटी सुरक्षित राहील.

एसटीमध्ये कचरा पेटी पासून ते मोबाईल चार्जर पर्यतची सोय त्यांनी उपलब्ध करून दिली आहे. विशेष म्हणजे या दोन्ही एसटी ग्रामीण भागातील फेऱ्यांसाठी आहेत. 

एसटीकडे प्रवासी आकर्षित व्हावेत व त्यांना सुखकर आणि सुरक्षित प्रवास मिळवून देण्यासाठी दोन एसटी दत्तक घेतल्या आहेत. यातून एसटीची प्रतिमा सुधारण्याचा ही उद्देश आहे. एसटी दत्तक दिल्याबद्दल आगार व्यवस्थापकांचे आभार मानतो. 
- बाळासाहेब कांबळे
, चालक 

गेल्या चाळीस वर्षांपासून एसटीने प्रवास करत आहे. चालक बाळासाहेब कांबळे यांची एसटी बद्दलची आस्था नेहमीच जाणवली आहे. स्व खर्चातून एसटी प्रवाशांना सोयी देण्याचा त्यांचा हा उपक्रम नक्कीच कौतुकास पात्र आहे. 
माधव ठाकूर,
प्रवासी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com