माळरानावर फुलविला स्ट्रॉबेरीचा मळा

strawberry
strawberry

कुर्डू (सोलापूर)-माळरानाची जमीन, जेमतेमच पाणी, शेतीला जोड धंदा म्हणुन दुध व्यवसाय करण्याची माढा तालुक्यात परंपरा आहे व दुध उत्पादनात अग्रेसर आहे‌ व ज्या भागात पाणी तेथील शेतकरी ऊस लागवडीसाठी कल असतो. पण आपण इतर शेतकऱ्या पेक्षा काही तरी वेगळे केले पाहिजे या उद्देशाने मुळ चे कुर्डू चे पण  लऊळ (ता.माढा) येथे स्थाईक असलेले  शेतकरी सुनिल कापरे  यांनी  आपल्या शेतात 05 गुंठे क्षेत्रात स्ट्रॉबेरीची प्रायोगिक तत्त्वावर लागवड केली असून, त्यामध्ये टपोरी फळेही मिळायला सुरुवात झाली आहे. आपल्या शेतात नावीन्यपूर्ण प्रयोग करुन कापरे यांनी दुष्काळी भागातील शेतकऱ्यां पुढे वेगळा आदर्श निर्माण केला आहे .

सुनिल कापरे  यांना हिंदवी परिवार च्या वतीने बारामती येथे कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी शेतकऱ्यांची सहल नेण्यात आली होती तेथे  स्ट्रॉबेरीच्या पिकांची डेमो प्लाॅट व्दारे माहिती घेतली आपल्या शेतामध्ये त्यांनी त्या पद्धतीने नियोजन केले तर असा विचार केला व कामाला लागले  . आडवी-उभी नांगरट करून रान तापत टाकले. पाच फुटाचे बेड तयार केले व सरळ लाईन ला दोन रोपांची लागवड शेड नेट  केली आहे.

महाबळेश्वर येथील येथुन 1050रोपे आणली . नोव्हेंबर मध्ये लागवड केली व चाळीस दिवसानंतर फुल धारणेला सुरवात झाली आहे.महाबळेश्वर भागात एका रोपाचे सहा बहर होतात, पण आपल्याकडे उष्णता जास्त असल्याने तीनच बहर अपेक्षित धरले आहेत.

कापरे यांनी स्ट्रॉबेरीची ‘नाबेला व एसी’ जातीची च्या  रोपांची लागवड केल्यानंतर त्यांना पाट पद्धतीने पाणी देण्यापेक्षा ठिबकने देण्याचे फायदेशीर होईल. त्याचा खते, अन्नद्रव्ये व कीटकनाशकेही देण्यासाठी वापर करता येऊन श्रम कमी होईल म्हणून ठिबक पद्धतीचा वापर केला आहे. लागवड केल्यानंतर कोरोमंडल कंपनीचे अल्ट्रासाॅलवन 1फुलधारणेच्या आगोदर व फुलधारणेनंतरअल्ट्रासाॅलवन 2  हे ड्रिप मधुन व  यातूनच एक दिवसा आड  दिवसांतून एकवेळ 12.61,13 40 13 कोरोमंडल कंपनी च्या  खताची आर्धा किलो मात्रा दिली. ५० ते ५५ दिवसांत फळधारणा सुरू होऊन  स्ट्रॉबेरीच्या प्रत्येक झाडास फळ किमान १०० ते २०० ग्रॅमचे मिळू लागले. 

या पिकावर भुरी, करपा, लालकुळी, थ्रीप्स या रोगांचा धोका असतो त्या साठी दररोज निरिक्षण करण्याची गरच आहे. स्ट्रॉबेरीसाठी थंड-उष्ण असे महाबळेश्वर पद्धतीचे हवामान लागते. तसे हवामान आपल्याकडे हिवाळ्यात असल्याने साधारण आॅक्टोबर ते मार्च असा सहा महिन्यांचा कालावधी या स्टॉबेरी पिकासाठी पोषक आहे. सध्या फळधारणा सुरू  झाली  असून, 
जानेवारीत प्रत्येक झाडाला 200ग्रॅम स्ट्रॉबेरी उत्पन्न मिळाले. व मार्च आखेर आणखी दोन तोडे होतील.

फळे टपोरी व तजेलदार असल्याने 250 ते 300 रुपये दर मिळत आहे. दररोज व्यापारी फोन करून स्ट्रॉबेरीची मागणी करीत असल्याने विक्रीसाठी कष्ट घ्यावे लागत नाहीत. लागवड, खते, मशागत व कीटकनाशकांसाठी आतापर्यंत 45 हजार रुपये खर्च आला आहे. मात्र फेब्रुवारी, मार्च, एप्रिल या तीन महिन्यां पर्यंत प्रत्येक स्ट्रॉबेरीच्या  रोपाचे सरासरी  आर्धा  किलो उत्पन्न ग्रहीत धरुन 1050 रोपांची पासुन पाचशे कालो  उत्पन्न मिळेल व 300  रुपयेप्रमाणे दर मिळाला तरी एक लाख पन्नास हजार उत्पन्न अपेक्षित असल्याचे कापरे यांनी सांगितले. याचा अर्थ केवळ पाच गुंठे जमिनीत कल्पकता असेल तर उसापेक्षा चांगले उत्पन्न मिळवीत शेती फायद्याची करता येऊ शकते हे सिद्ध होते. शेतीमध्ये जरा वेगळी वाट शोधली तर मिळालेल्या उत्पादनासाठी बाजारपेठ सहज मिळते.

स्ट्रॉबेरीसाठी जमिनीची प्रत हलकी असली तरी चालते. याची रोपे महाबळेश्वर येथून मागविले. याची लागवड आॅक्टोबरमध्ये केल्याने फायद्याचे होते. आॅक्टोबर ते मार्च महिन्यांत स्ट्रॉबेरीसाठी पोषक वातावरण असते. हे पीक केवळ सहा महिन्यांचे व फायद्याचेही आहे. व असे नवनविन प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांना कृषी विभागाने सहकार्य केल्यास आणखी धाडस निर्माण होईल.
-सुनिल कापरे लऊळ ता माढा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com