शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी राबवल्या जाणाऱ्या योजनांचा फायदा घ्यावा

mangalwedha
mangalwedha

मंगळवेढा - तालुक्यातील शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी विविध योजना खरेदी विक्री संघ व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून राबविल्या जात आहेत. याचा फायदा घेण्याचे आवाहन सहायक निंबधक म्हाळाप्पा शिंदे यांनी व्यक्त केले. तालुका खरेदी विक्री संघ व महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशन यांच्यावतीने हमीभाव मका खरेदी ऑनलाइन नोंदणीच्या प्रसंगी ते बोलत होते. 

यावेळी जिल्हा बॅक संचालक बबनराव आवताडे, अध्यक्ष सिध्देश्वर आवताडे, राजीव बाबर, आबा लांडे, जे.एम, पवार सचिन देशमुख दादा बाबर, विशाल जाधव, सुनिल जाधव, विनायक आवताडे आदीसह खरेदी विक्री संघाचे संचालक शेतकरी उपस्थित होते. 

यावेळी बोलताना अध्यक्ष सिध्देश्वर आवताडे म्हणाले की हमीभाव खरेदी केंद्रावर तालुक्यासह जिल्ह्यामधील इतर शेतकर्यांना हरभरा खरेदी ७४९७ क्विंटल खरेदी झालेली होती. त्याची एकूण रक्कम ३ कोटी ४९ लाख ७० हजार तूर खरेदी ८८४० क्विंटल झालेली होती. त्याची एकूण रक्कम ४ कोटी ८१ लाख ७५ हजार तसेच मका खरेदी क्विंटल १४१८४ झालेली होती. व त्याची एकूण रक्कम २ कोटी ७ लाख ७९ हजार असे एकूण १० कोटी ३९ लाख इतकी रक्कम शेतकर्यांच्या खात्यावर जमा केल्यामुळे शेतकऱ्यांचा विश्वास वाढला. २०१७-१८ मध्ये किमान आधारभूत किंमत योजने अंतर्गत NeML पोर्टलवर नोंदणी केलेल्या ज्या शेतकऱ्यांकडून खरेदी न झालेला हरभरा प्रती क्विंटल १००० रु प्रमाणे अर्थसहाय्य मिळणेबाबत महाराष्ट्र शासनाच्या सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाने १ नोवेंबर २०१८ रोजी पारित केलेल्या शासन निर्णयास अनुसरून सदरची रक्कम मिळवून देणे साठी खरेदी विक्री संघामार्फत पाठपुरावा सुरु असून लवकरच हि रक्कम शेकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार असून यंदाच्या हंगामात आधारभूत किंमत प्रती क्विंटल १७०० रु असून ऑनलाईन नाव नोंदणीसाठी ७/१२ उतारा, पिकपाणी दाखला, मूळ आधारकार्ड, मूळ बँक खाते पुस्तक आणि या सर्वांच्या सत्यप्रती (झेरॉक्स)व मोबाइल नंबरसह नोंदणी करणे आवश्यक आहे. एसएमएस प्राप्त शेतकर्‍यांनी मका विक्री साठी हमीभाव केंद्रावर आणायची आहे.खरेदी केलेल्या मकेची रक्कम ऑनलाइन आपण दिलेल्या खात्यावर जमा होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com