उदयनराजेंकडून राजघराण्याचा फायदा : आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले

shivendra-raje
shivendra-raje

सातारा : राजघराण्यावर साताऱ्याचे जनतेचे वर्षानुवर्ष प्रेम आहे याची कोठे तरी जाणीव खासदारांनी कधीतरी मनामध्ये ठेवली पाहिजे. नेमके आपण सातारकरांच्या प्रेमाचा किती गैरफायदा घेतोय. त्यांच्या भावनांचा स्वत:च्या स्वार्थासाठी व राजकीय फायदयासाठी आपण कसा ही वापर करतोय अशी बोचरी टीका आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी करुन खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर केली आहे.

आमदार भोसले म्हणाले पालिकेचे मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी शहरातील सार्वजिनक गणेशोत्सव मंडळांना मंगळवार तळ्यात विसर्जन करू नये अशा आशयाच्या नोटीसा काढल्या आहेत. पालिकेत सत्ता खासदारांची आहे आणि त्यांनी मंगळवार तळे माझ्या मालकीचे तेथेच विसर्जन करा असे सांगत आहेत. दूसरीकडे पालिका प्रशासनाने तळ्यात विसर्जन करु नये यासाठी मंडळांना नोटीसा पाठविल्या आहेत. खासदारांची स्टंटबाजी आणि नौटंकी वर्षानुवर्ष सुरू आहे. भडक बोलायचे आणि मी कसे वेगळे करतोय, प्रशासकीय यंत्रणेला कसे ठोकले हे ते नेहमीच दाखवातात. खासदारांचा लहरीपणाचा कारभार सुरू असून ते पालिकेच्या सत्तेचा मनमानीपणे वापर करत आहेत. लोकांच्या भावना, त्यांच्या अडचणी न समजून घेता काही ही करायचे. आज राजघराण्यावर वर्षानुवर्ष प्रेम करत आहेत. परंतु स्वत:च्या स्वार्थासाठी आपण त्याचा किती वापर करायचा याची त्यांनी जाणिव ठेवली पाहिजे. रविवारी आम्ही पत्रकार परिषद घेतली त्यातून आम्हाला सातारकरांना हेच दाखवून द्यायचे होते.

खे काय आणि खोटे काय यांच्यात किती नौटंकी असते. राजमाता कल्पनाराजे भोसले यांनी दिलेले पत्र आणि त्याच वेळेला खासदार उदयनराजेंचे पत्र. त्याचे स्पष्टीकरण द्यावे एवढेच आमचे म्हणणे होते. आता तर मला असे म्हणायचे आहे बोलबच्चनगिरी करणारा खासदार पाहिजे की सातारकरांसाठी कामगिरी करणारा खासदार पाहिजे, याचा विचार सातारकरांनी करावा असे आवाहन ही शिवेंद्रसिंहराजेंनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com