पर्यावरणवाद्यांच्या विरोधामुळे कृत्रिम पावसाचा प्रयोग रद्द

The use of artificial rain cancel due to environmen issue
The use of artificial rain cancel due to environmen issue

सोलापूर : जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे डॉ.राजा मराठे यांच्या संशोधनातून पुढे आलेला कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्याचा विचार होता. हा प्रयोग खर्चिक नसल्याने एक प्रायोगिक तत्त्वावर करण्याचे ठरले होते. तर याला पर्यावरणवाद्यांनी विरोध केला आहे. धुरामुळे पर्यावरणाची हानी होणार आहे, असे पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे. त्यामुळे हा प्रयोग रद्द करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली.

शनिवार, रविवार असे दोन दिवस जिल्ह्यातील ११२४ गावात हा प्रयोग होणार होता. मात्र जिल्ह्यातील पर्यावरण प्रेमींकडून याला विरोध होत आहे. हा प्रयोग कोणाच्या भावना दुखावण्यासाठी किंवा पर्यावरणाची हानी होण्यासाठी करण्याचा उद्देश नाही. केवळ जिल्ह्यात काही करून पाऊस पाडण्याचा एक छोटासा प्रयत्न होता. मात्र यातून पर्यावरण प्रेमी जर दुखवले जात असतील, तर विनाकारण वाद नको म्हणून हा प्रयोग रद्द करण्यात आला अशी माहिती डॉ. भोसले यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com