कऱ्हाड : शहरात भाजी मंडईचे पालिकेचे नियोजन कोलमडले

karhad
karhad

कऱ्हाड : शहरात रविवार व गुरूवार अशा दोन्ही बाजारादिवशी भाजी मंडईचे पालिकेचे पूर्ण नियोजन कोलमडले आहे. त्यामुळे भाजी विकण्यास येणारा शेतकरी रस्त्यावर तर भाजी विक्रेता व्यापारी शेतकऱ्यांना बांधलेल्या इमारतीत अशी, अवस्था झाली आहे. त्याला पालिकाच जबाबदार आहे.

मंडईची व्याप्ती शहरातील मुख्य रस्त्यावर वाढून सुमारे दिड किलोमीटरपर्यंत लांबच लांब बसस्थानकाच्या अलीकडपर्यंत जावून थडकली आहे. मंडईसाठी कोट्यावधींचा खर्च घालून बांधलेली वास्तूचा प्रत्यक्ष शेतकऱ्यांना काहीच उपयोग झालेला नाही. मंत्री सदाभाऊ खोत यांनी शेतकऱ्य़ांना पालिकेच्या आवारात बसण्याचे आदेश दिले होते. ते जेमतेम दोनच वेळा कसेतरी पाळले. त्यानंतर पुन्हा शेतकऱ्यांना तेथे अटकाव घातला गेला. त्यामुळे शहरातील रस्त्यावर भाजी मंडईची व्याप्ती वाढली आहे. ती वाहतूकीच्या कोडीत भर व स्थानिकांसाठी डोकेदुखी ठरते आहे. 

येथील भाजी मंडईचा विस्तार व व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे. त्याच्या नियोजनात पालिकेला साफ अपयश येत आहे. त्यामुळे वाढणारी भाजी मंडईची व्याप्ती शहरातील वाहतूकीवर परिणाम करणारी ठरू लागली आहे. पालिकेचे फसलेल्या नियोजनाचा फटका शहराला सोसावा लागतो आहे. कोट्यावधींचा खर्च घालून बांधलेली भाजी मंडईची इमारत शेतकऱ्यांसाठी देण्यातही पालिकेला अपयश आले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातून रविवार व गुरूवार असा बाजाराच्या दिवसी भाजी विकण्यास येणाऱ्या शेतकऱ्यांना रस्त्यावरच दुकान थाटावे लागत आहे. शेतकऱ्यांना मुळच्या भाजी मंडईच्या आसपासही फिरून दिले जात नाही. काही ठरवाविक लोकांचीच मक्तेदारी तेथे चालते. त्यामुळे विस्तारणारी बाजारपेठेत दिड किलोमीटर लांब लचक झाली आहे. तरिही पालिका, त्यातील जबाबदार घटक त्याकडे ढूंकूनही पाहताना दिसत नाहीत. त्या निमित्ताने होणारी वाहतूकूच कोंडीकडे पोलिसांचे दुर्लक्ष आहे. भाजी मंडईची व्याप्तीला जबाबदार असऱ्यांनीच त्याकडे दुर्लक्ष केल्याने शहरवासींयांना त्याची डोकेदुखी वाढली आहे. 

पालिकेने काही वर्षापूर्वी येथे भाजी मंडईची सुसज्ज इमारत उभा केली. त्यात शेतकऱ्यांची व विक्रेत्यांची सोय करण्यात येणार होती. मात्र प्रत्यक्षात त्याचे नियोजन फिसकटल्याने त्या वास्तूत काही ठराविक लोकाची मक्तेदारी सुरू आहे. तेथे शेतकरी गेला की, हुसकावून लावले जाते. वस्तूस्थिती माहिती असूनही त्याकडे मतांच्या आकड्यात अडकलेले स्थानिक लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करतात. त्यामुळे ग्रामीण भागातून येणाऱ्या शेतकरी विक्रेत्याला येथे कोणीच वाली नाही, अशी अवस्था झाली आहे. ज्यांच्याकडे न्याय मागायचा तेच त्यांच्याकडे ढूंकूनही पाहत नाही. पर्यायाने ग्रामीण भागातील शेतकरी मुख्य रस्त्यावर बसू लागला. बसता बसता शेतकऱ्यांनी शहरातील सुमारे दिड किलोमीटरचा मुख्य मार्गाच आता काबीज केला आहे. भाजी मंडईपासून रस्त्यात बसणारे विक्रेते बुधवार पेठ, महात्मा फुले पुतळा, बुरूड गल्ली, रैनाक गल्लीपासून थेट डॉ बापूजी साळुंखे यांच्या पुतळ्यापासून जिल्हा न्यायालयाच्या इमारतीपर्यंत बसत आहेत. तो मार्ग शहरातील मेन रोडला पर्यायी आहे. मेन रोडला कोंडी झाली की, याच मार्गाने पर्यायी वाहतूक व्यवस्तीत सुरू असते. तो मार्ग शहरातील सगळ्या भागात जातो. तोच विक्रेत्यांमुळे कोंडीत अडकतो आहे. त्यावर पालिकेने लवकरात लवकर उपाय न शोधल्यास किंवा शेतकऱ्यांना पर्याय न दिल्यास स्थानिकांच्या रोषाला व विद्रोला सामोरे जावे लागणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com