Vidhansabha 2019 : राष्ट्रवादी काँग्रेसकडून सांगलीत १६ जण इच्छुक

Vidhansabha 2019 : राष्ट्रवादी काँग्रेसकडून सांगलीत १६ जण इच्छुक

सांगली - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे सांगली जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीसाठी १६ इच्छुकांनी उमेदवारी अर्जाची मागणी केली आहे. राष्ट्रवादी पक्षाच्या इच्छुकांना जिल्हा कार्यालयात तसेच ऑनलाईन अर्जाचे आवाहन केले होते. 

जिल्ह्यातील मतदारसंघ व इच्छुक असे-

शिराळा- माजी आमदार मानसिंगराव नाईक, इस्लामपूर- राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, पलूस-कडेगाव-राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य शरद लाड, तासगाव- कवठेमंकाळ विधानसभा मतदारसंघ- आमदार सुमनताई पाटील यांनी उमेदवारी अर्जाची मागणी केली आहे.

खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघातून ॲड. बाबासो मुळीक, हणमंतराव देशमुख, रावसाहेब पाटील यांनी उमेदवारी मागितली आहे. जत विधानसभा मतदारसंघातून सुरेश शिंदे, रमेश पाटील, सांगलीचे नगरसेवक विष्णू माने व ॲड. चन्नाप्पा होर्तीकर, सुनिता कोकाटे यांनी उमेदवारीची मागणी केली आहे. मिरज विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीकडे सर्वाधिक म्हणजे पाच इच्छुकांनी मागणी केली आहे. त्यात जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे संचालक बाळासाहेब होनमोरे, सुनीता कोकाटे, श्रावण माने, प्रमोद इनामदार आणि उत्तम कांबळे यांनी उमेदवारीची मागणी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com