सोलापुरात निवडणूक पूर्णपणे जातीनिहाय झाल्याचे स्पष्ट

Solapur
Solapur

सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदार संघाची निवडणूक ही पूर्णपणे जातीनिहाय झाल्याचे स्पष्ट झाले असून, त्याला मोदी लाटेची जोड मिळाली. या मतदारसंघातील प्रमुख तीन उमेदवारांना प्रत्येक विधानसभा मतदारसंघात मिळून तब्बल 1627 केंद्रांवर दोन अंकी मतदान झाले. ज्या परिसरात एखाद्या उमेदवाराचे प्राबल्य, त्या ठिकाणी उर्वरीत दोघांना दोन अंकी व काही ठिकाणी एक अंकी मतदान झाले आहे. 

सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात ज्या भागात भाजपचे प्राबल्य आहे, त्या ठिकाणी सुशीलकुमार शिंदे व ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांना दोन अंकी मतदान झाले. ज्या भागात शिंदे यांचे प्राबल्य आहे, त्या ठिकाणी डॅा. जयसिद्धेश्वर आणि आंबेडकर यांना दोन अंकी मतदान झाले. ज्या भागात आंबेडकरांचे प्राबल्य होते, त्या ठिकाणी डॉ. जयसिद्धेश्वर व शिंदे यांना दोन अंकी मतदान झाले आहे. 

सोलापूर लोकसभा मतदारसंघात एकूण सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. या सर्व मतदारसंघात मिळून डॅा. जयसिद्धेश्वर यांना 168, श्री. शिंदे यांना 390 तर अॅड.
आंबेडकर यांना 1069 केंद्रांवर दोन अंकी मतदान झाले आहे. मोहोळ मतदारसंघात डॅा. जयसिद्धेश्वर, अक्कलकोटमध्ये शिंदे तर दक्षिण सोलापूर मतदारसंघात 
आंबेडकर यांना एक अंकी मतदानाचे प्रमाण सर्वाधिक आहे. डॅा. जयसिद्धेश्वर यांना सोलापूर शहर उत्तर, अक्कलकोट व दक्षिण सोलापूर मतदारसंघाने तारले, तर शिंदे यांना पंढरपूर व मोहोळ मतदारसंघाने तारले. आंबेडकर यांनी सहाही मतदारसंघात प्रत्येकी 25 हजारांच्या वर मते मिळवली.

शिंदेंना आघाडी मिळालेल्या मोहोळ मतदारसंघात त्यानी 30 हजार 145 मते मिळवली. एकूणच ही निवडणूक जातीवर आधारीतच झाल्याने तिन्हीही उमेदवारांना आपापल्या पक्षाच्या समर्थकांसह जातीचे मतदान झाल्याने प्रतिस्पर्धी उमेदवारांना दोन अंकी मतदान होण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले. एकाच केंद्रावर तिन्ही उमेदवारांना तीन अंकी मतदान झाल्याचे क्वचित ठिकाणी आहे.  

पहिल्या तीन उमेदवारांना दोन अंकी मतदान झालेल्या केंद्रांची संख्या
----------------------------------------------------------
मतदारसंघ        डॅा.जयसिद्धेश्वर    सुशीलकुमार शिंदे       अॅड. बाळासाहेब आंबेडकर
--------------------------------------------------------------
मोहोळ             32                19                    81
शहर उत्तर          13               114                  183
शहर मध्य           52                67                 187
दक्षिण सोलापूर       26                99                  218
अक्कलकोट          23                80                  214
पंढरपूर             22                 11                  186
------------------------------------------------------
एकूण             168               390                   1069

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com