पाणी विकत घेण्याची शिंगणापुरात वेळ!

Bisleri
Bisleri

शिखर शिंगणापूर - परिसरातील विहिरींनी तळ गाठला तर ऐतिहासिक ३५ एकर क्षमतेचा आणि २५ फूट खोली असलेला पुष्करतीर्थ तलावात मृत पाणीसाठा आहे  येथील ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करून पाणी विकत घ्यावे लागत आहे. शिखरवस्तीवरील ग्रामस्थांना ५०० लिटर पाण्यासाठी २५० ते ३०० रुपये मोजावे लागत आहेत.

शिंगणापूरकरांना प्रतिवर्षी जवळपास चार महिने पाणीटंचाई भेडसावत असते. यंदा पण ही टंचाई फेब्रुरवारीतच जाणवू लागली असून सहा महिने समस्या भेडसावणार असून आता तर यक्ष प्रश्नच उभा आहे. 

शिंगणापूर ग्रामपंचायतीची पाणीपुरवठा विंधनविहीर कोरडी पडली तरी किमान पुष्कर तलावामध्ये दहा ते २० टक्के तरी किमान पाणी असते. त्यामुळे परिसरातील दोन-चार बोअरवेल, हातपंप वा इतर जलस्त्रोत सहा महिने जिवंत राहून शिंगणापूरची का होईना नक्‍की तहान भागते. सध्या शिंगणापूर परिसरातील मुख्य जलस्त्रोत पुष्कर तलावातच पाणी नाही. त्याचा परिणाम परिसरामध्ये कोठेही पाणीसाठा उपलब्ध नाही. शिंगणापूर ग्रामपंचायत आतापर्यंत पाच ते आठ दिवसाआड पाणी सोडत आहे. तेही पुरेसे नाही म्हणून गरजेनुसार ग्रामस्थ २०० ते ३०० रुपये ट्रॅक्‍टर व १००० ते १२०० रुपये टॅंकरने पाणी विकत घ्यावे लागत आहे.

स्थानिक रिक्षावाले ग्रामपंचायतीच्या मालकीच्या बोअरचे पाणी उपसण्यासाठी दिवस-रात्र थांबत असून हे पाणी रिक्षा जादा पैसे घेऊन विकत आहेत. तेव्हा ग्रामपंचायतीने या रिक्षांना पाणी विकणारांकडून पाणी कर लावावा, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. 

ग्रामपंचायतीने टॅंकर मागणी प्रस्ताव यापूर्वीच शासनाकडे पाठविला आहे. शिंगणापूर प्रादेशिक नळ योजना सुरू करण्याची मागणीही ग्रामपंचायतीने केली आहे. या बाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी बैठक घेतली होती. मात्र, अद्याप पुढे काही झाले नाही. शिंगणापूर पायथ्याशी आलेले धोम-बलकवडी कालव्याचे पाणी उचलून तीन किलोमीटर अंतराने पुष्कर तलावात येऊ शकते. मात्र, अद्यापही हे सर्व खेळ केवळ कागदोपत्रीच शासनदरबारी सुरू आहेत.

पाहणी करून ठोस उपाययोजना करा
दरम्यान, शिंगणापूरकर ग्रामस्थांना भेडसावणारी पाणी समस्या सोडविण्यासाठी माणच्या तहसीलदार, माणचे गटविकास अधिकारी यांनी समक्ष पहाणी करून ठोस उपाययोजना कराव्यात, अशी आग्रही मागणी होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com