पारनेरमध्ये पाण्यासाठीचे आंदोलन घेतले मागे

parner.jpg
parner.jpg

पारनेर : पिंपळगाव जोगा धरणाचे पाणी सुटून 18 दिवस झाले तरीही पारनेरला पाणी आले नाही. पुणेकरांनी पारनेरचे पाणी पळविल्याने ते तालुक्यात पोहचलेच नाही. म्हणून या लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांनी आज देवीभोयरे फाटा येथे रस्ता रोको केला. या वेळी कार्यकारी अभियंता किसन कानडे यांनी दोन दिवसात पाणी तालुक्याच्या हद्दीत बंदोबस्तात आणण्यात येईल व वडझीरे टेल टँक मध्ये गरजेपुरते पाणी साठे पर्यंत आवर्तण सुरू ठेवले जाईल असे आश्वासन दिल्या नंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

आज(ता.13) सकाळी साडेनऊ पासून भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष विश्वनाथ कोरडे, वडझिरेचे सरपंच शिवाजी औटी संतोष काटे, बाबाजी भंडारी, सभाष बेलोटे, बाळासाहेब नवले, डॉ. सुभाष माळवे, गणेश मापारी, भाऊसाहेब डेरे, बबनराव गधांक्ते, सतीष गवडे, राजेंद्र आवारी अर्जुण आवारी आदीं सह मोठ्या संखेने वडझिरे, आळकुटी, बाभुळवाडे, कळस, देविभोयरेव रांधे या परिसरातील लाभार्थी शेतकऱ्यांनी या आंदोलनात भाग घेतला. कोरडे, औटी, काटे, बेलोटे, भंडारी व नवले आदींची भाषणे झाली.

या वेळी तहसीलदार गणेश मरकड, पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले व कार्यकारी अभियंता कानडे यांनी आंदोलकांची मध्यस्थीकरत उद्या पर्यंत पारनेरच्या हद्दीत पाणी येईल व किमान पाच दिवस पाण्याचे अवर्तन वाढवून दिले जाईल व पारनेरकराच्य़ा गरजेपुरते पाणी दिले जाईल असे अश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. 
पारनेरसाठी 25 नोव्हेंबरपासून पिंपळगाव जोगाचे आवर्तन सोडले आहे. आवर्तनाचा कालवधी 20 दिवसांचा आहे. अाता आवघे दोन दिवस बाकी आहेत. आवर्तनाचा कालावधी वाढविला नाही तर पुन्हा देवीभोयरे टेल टँकमध्ये पाणी येईपर्यंत आवर्तनाचा कालवधी संपलेला असेल त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. कारण पाणी पोहचेल व पाठीमागे पाणी बंद होईल अशी शक्याता नाकारता येत नाही.

''सलग पाच दिवस आर्वतन वाढवून देऊन पुर्ण दाबाने पाणी दिले जाईल असे अश्वासन अधिकाऱ्यांनी दिले आहे. पाणी उद्यापर्यंत पारनेरला आले नाही तर, गुरूवारी पुन्हा तिव्र आंदोलन केले जाईल व मग मात्र आम्ही मागे हटणार नाही.''
- विश्वनाथ कोरडे, अध्यक्ष, भारतीय जनता पक्ष

''आज सायंकाळ पर्यंत पाणी पारनेरच्या हद्दीत येईल. उद्या देवीभोयरे टेल टँकमध्ये पाणी येईल त्यासाठी आम्ही पुर्ण दाबाने पाणी सोडले आहे. तसेच पुणे जिल्ह्यात कालव्यावर बंदोबस्त लावला आहे. बंदोबस्तातच पाणी थेट देवीभोयरे टेल टँकमध्ये येईल. गरज भासली तर आवर्तनाचा कालावधी वाढविण्यात येईल
- किसन कानडे. कार्यकारी अभियंता, पिंपळगाव जोगा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com