सातव विद्यालयाचा संस्था वर्धापनदिन उत्साहात साजरा

wagholi
wagholi

वाघोली : वि.शे.सातव विद्यालयाचा संस्था वर्धापनदिन उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी विद्यालयास देणगी देणाऱ्यांचा व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

संस्थेचे सदस्य प्रदीप कदम, माजी आमदार अशोक पवार, वासंती बोर्डे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी एम एम पीरजादे, रावसाहेब आवारी, एम. के. निंबाळकर, सरपंच वसुंधरा उबाळे,  रामदास दाभाडे, माजी सरपंच शिवदास उबाळे, चंद्रकांत सातव, प्राचार्य टी के वाघचौरे, लायन्स क्लबचे सदस्य विद्यालयाचे आजी माजी मुख्याध्यापक व आजी माजी अध्यापक, माजी विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.       

विद्यालयात कार्यरत असलेले अध्यापक यु.जी गोडसे, पी. पी. बैरागी कार्यालयीन अधिक्षक एस. एस. गिरी यांचा शिक्षण क्षेत्रातील प्रदीर्घ कामगिरी बदल गौरव करण्यात आला. तर सेवानिवृत्ती नंतर शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनिय कामगिरीबददल एन. के. निंबाळकर यांचा लायन्स क्लबच्या वतीने गौरव करण्यात आला. त्याच बरोबर डीजीटल क्लासरूमचे फर्निचर दिल्याबददल मान्यवरांच्या हस्ते देणगीदारांचा सत्कार करण्यात आला. डिजीटल क्लासरूमचे उद्घाटन यावेळी पवार यांच्या हस्ते करण्यात आले. एस. ए.माने यांनी सूत्रसंचालन केले. ए.एन गोरे यांनी आभार मानले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com