पुरंदरला पंचायत समितीच्या सभापतीपदी शिवसेनेच्या अर्चना जाधव

saswad
saswad

सासवड : पुरंदर तालुका पंचायत समितीच्या सभापतीपदी शिवसेनेच्या अर्चना समीर जाधव यांची आज बिनविरोध निवड झाली. सभागृहातील आठ जागांपैकी शिवसेना सहा व काँग्रेस दोन असे बलाबल असल्याने शिवसेनेचे राज्यमंत्री विजय शिवतारे यांचेच पुन्हा एकहाती वर्चस्व स्पष्ट झाले. उपसभापती दत्ता काळे यांना तूर्त अभय मिळाले आहे.  तर मावळते सभापती अतुल म्हस्के हे गटनेते पध्दतीने पंचायत समितीत वडीलकीच्या नात्याने प्रमुख राहतील, असे शिवतारेंनी जाहीर केले.

दिड वर्षांपूर्वी झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीला तालुका पंचायत समितीवर प्रथमच भगवा फडकला होता. पहीले सभापती म्हणून शिवसेनेने अतुल म्हस्के यांना वर्षाची संधी दिली होती. मात्र दिड वर्षांचा कार्यकाल पूर्ण केल्यावर त्यांना राजीनाम्याचे श्री. शिवतारे यांच्याकडून सांगितले गेले. त्यामुळे रिक्त जागी आज परींचे गावच्या पंचायत समिती सदस्या अर्चना जाधव यांची वर्णी लागली. पुरंदर तालुका पंचायत समितीच्या सासवड (ता. पुरंदर) येथील सभागृहात आज पीठासन अधिकारी व प्रांत संजय असवले यांच्याकडे दिलेल्या वेळेत सभापतीपदासाठी सौ. अर्चना जाधव यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला. त्यानंतर दुपारी प्रत्यक्ष निवडणुकीची विशेष सभा सुरु झाली. त्यात छाननी व माघारीस रितसर वेळ दिल्यानंतर श्री. असवले यांनी त्यांची निवड बिनविरोध झाल्याचे सभागृहात जाहीर केले. त्यानंतर बँड वाजवून व फटाके फोडून आनंद व्यक्त करण्यात आला.  

यावेळी सदस्य सर्वश्री अतुल म्हस्के, दत्तात्रेय काळे, रमेश जाधव, नलीनी लोळे, प्रा. गोरखनाथ माने हे उपस्थित होते. तर गट विकास अधिकारी मिलींद टोणपे, सहायक गट विकास अधिकारी मोरे हेही उपस्थित होते. तर सत्काराच्या वेळी राज्यमंत्री शिवतारे, जि.प.सदस्य दिलीप यादव, ज्योती झेंडे, शिवाजी पवार आदीही उपस्थित होते. नूतन सभापती अर्चना जाधव या शिवसेनेच्या तिकीटावर वीर पंचायत समिती गणातून सर्वसाधारण जागेवर निवडुण आलेल्या आहेत. त्यांचे पती समीर जाधव हे आजही परींचे गावचे सरपंच असून शिवसेनेचे ते पदाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. दरम्यान, मावळते सभापती श्री. म्हस्के यांच्या राजीनाम्यापाठोपाठ उपसभापती दत्ता काळे हे सुध्दा राजीनामा देण्याचे निश्चित मानले जात होते. मात्र उपसभापती दत्ता काळे यांना तूर्त अभय मिळाले आहे. त्याबाबत शिवतारेंनी यांनीच खुलासा केला. 

नूतन सभापती अर्चना जाधव यांचे माहेर (धुमाळांचे) श्रीक्षेत्र वीरचे अन् सासर हे (जाधवांचे) परींच्याचे. त्यामुळे राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी सभापतीपद खुले असतानाही.. वीर व परींचे या दोन्ही गावांना एकसाथ `खुशी` देण्याचा प्रयत्न केल्याचे मानले जात आहे. 39 वर्षांनी परिंच्यात सभापतीपद आले. तर लेकीच्या रुपाने वीरलाही प्रथमच संधी मिळाली.   

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com