छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे सुशोभिकरणाची विविध संघटनांची मागणी (व्हिडिओ)

pune.jpg
pune.jpg

पुणे : छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याचे सुशोभिकरण करण्याची मागणी अखिल भारतीय शिवमोहत्सव समितीचे अध्यक्ष विकास पासलकर यांनी मागणी केली होती. तसेच विविध संघटनांकडून मागणी होत आहे. ''ही रास्त असून आपण सर्वांनी एकत्र मिळून संभाजी महाराज यांच्या पुतळ्याचे सुशोभिकरण केले पाहिजे'', अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी श्री छत्रपती संभाजीराजे जन्मोत्सव सोहळा दरम्यान दिली.

संभाजी ब्रिगेड आणि अखिल भारतीय शिवमोहत्सव समिती, मराठा सेवा संघ आणि जिजाऊ ब्रिगेड यांच्या तर्फे श्री छत्रपती संभाजीराजे जन्मोत्सव सोहळा मंगळवारी साजरा करण्यात आला. एस.एस.पी एम.एस. मैदान ते डेक्कन येथील छत्रपती संभाजी महाराज चौक अशी संभाजी महाराज यांची पालखीतून मिरवणूक काढली. डेक्कन येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. 

छत्रपती संभाजीराजे यांच्या पुतळ्यास खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार संजय काकडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी मराठा सेवा संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर, माजी आमदार चंद्रकात मोकाटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन तुपे, माजी महापौर प्रशांत जगताप, महापालिका सह आयुक्त ज्ञानेश्वर मुळक, दत्ता खाडे सिद्धार्थ शिरोळे आदी उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com