१५ वितरकांना ९० लाखांना ठकविले

Crime
Crime

पुणे - शहरातील १५ मोबाईल वितरकांची सुमारे ९० लाख ९६ हजार रुपयांची फसवणूक करून एका दुकानदाराने ठकविल्याचा गुन्हा सहकारनगर पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे. सुमारे अडीच हजार मोबाईलही दुकानदाराने लंपास केले आहेत. 

या प्रकरणी संजय शहा (वय ५३, रा. ३५३, सेंटर स्ट्रीट, कॅंप) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार संबंधित दुकानदारांविरुद्ध अपहार आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहा हे मोबाईल वितरक असून, त्यांची कॅंपमध्ये पॉवर टेलिकॉम ही फर्म आहे. सातारा रस्त्यावर धनकवडीमध्ये संबंधित दुकानदाराने अनमोल टेलिकॉम हे दुकान मार्चमध्ये उघडले होते. त्याने शहा यांच्याकडून मोबाईल संच, तसेच सुटे भाग घेतले. त्यांच्यासह अन्य १४ वितरकांकडूनही त्याने मोबाईल आणि सुटे भाग घेतले. माल विकत घेतल्यावर काही महिने त्याने त्याचे पैसे वेळेत दिले. त्यामुळे त्यांचा त्या दुकानदारावर विश्‍वास बसला. त्यामुळे त्यांनी पुढेही त्याला माल उधारीवर दिला. दीपावलीचा सण आहे म्हणून त्याने मोठ्या प्रमाणात मोबाईल संच वितरकांकडून घेतले होते. मात्र, आठ नोव्हेंबरपासून त्याचे दुकान बंद असल्याचे दिसून आले. वितरकांनी चौकशी केली तेव्हा दुकान बंद करून दुकानदार पळून गेल्याचे आढळून आले. वितरकांच्या वतीने शहा यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली. त्यानुसार सहकारनगर पोलिस पुढील तपास करीत आहेत. 

नोकरांनी १० लाखांना फसविले
मगरपट्ट्यातील सीझन मॉलमधील फुडकोर्टमध्ये ‘९५ पास्ता-पिझ्झा’ हॉटेलमधील दोन नोकरांनी बिल मशिनमध्ये फेरफार करून सुमारे दहा लाख रुपयांचा अपहार केल्याचा गुन्हा हडपसर पोलिसांनी बुधवारी दाखल केला. या प्रकरणी हॉटेलतर्फे ओंकार मुरकुटे (वय ३०, रा. मोझे आळी, लोहगाव) यांनी फिर्याद दिली आहे. गेल्या वर्षी जुलै ते ११ नोव्हेंबरदरम्यान हा प्रकार घडला. दोन्ही नोकर ग्राहकांकडून रोख पैसे घेत. बिल मशिनमध्ये फेरफार केल्यामुळे त्याची नोंद त्यात होत नव्हती. हा प्रकार उघडकीस आल्यावर मुरकुटे यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com